कोपार्डे येथील कुस्ती मैदानात इराणचा रहेजा इराणी विजयी
कोपार्डे येथील कुस्ती मैदानात इराणचा रहेजा इराणी विजयी
(ग्रामपंचायत,यात्रा कमेटी व भैरोबा ट्रस्ट यांच्या आयोजनखाली संपन्न झाले आंतरराष्ट्रीय मैदान)
मनोजकुमार मस्के मांगरूळ
कोपार्डे ता. शाहूवाडी येथे भैरोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी झालेली आंतरराष्ट्रीय कुस्ती
महान भारत केसरी प्रवीण भोला विरुद्ध इंटरनॅशनल चॅम्पियन रहेजा इराणी (इराण) यांच्यातील लढतीत सुरुवतीपासूनच दोन्हीही मल्लांनी आक्रमक खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत मात्र अखेरच्या क्षणी पैलवान रहेजा इराणी यांने एकच्याक डावावर प्रवीण भोलावर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध विशाल बेंद्रे यांच्यातील लढतीत प्रकाश बनकर यांनी विजय मिळविला.
तिसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुल कोल्हापूरचा मल्ल अक्षय मंगवडे विरुद्ध पैलवान कौतुक डाफळे यांच्यातील लढतीत अखेर अक्षय मंगवडे गुणावर विजय झाला. मैदानातील अन्य विजेते मल्ल महारुद्र काळेल, विकास पाटील, अजित पाटील, कर्तार कांबळे, अमर पाटील, कुमार पाटील, दत्ता बनकर यांच्यासह कोपार्डे गावच्या प्रताप माने, रोहन जाडगे, प्रथमेश पाटील 'शुभम माने, पार्थ माने,ओंकार पाटील या स्थानिक मल्लानी चटकदार कुस्त्या करत शौकिनांची वाहवा मिळवली .
प्रारंभी यात्रा कमिटीचे अध्यक्ष शामराव कारंडे,भैरोबा ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष बाजीराव कळंत्रे, कोल्हापूर पोलीस विजय कारंडे, सरपंच बाळासो पाटील, उपसरपंच विक्रम चौगुले, मुंबई पदाधिकारी श्रीराम आरंडे, लक्ष्मण कळंत्रे, के जी मोरे, माजी सरपंच गुंडा पाटील, कोंडीबा कळंत्रे, ग्रा.पं.सदस्य सुभाष घागरे यांच्यासह सर्व यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मैदानाच पूजन करण्यात आले.
यावेळी मैदानात माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आमदार बाबासाहेब पाटील ,गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग , ऑलिंपिकवीर बंडा पाटील, उपमहाराष्ट केसरी संपतराव जाधव, वस्ताद आनंदा धुमाळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील, रविंद्र साळुंखे, 'उद्योगपती बाबुराव सागावकर, हिंदुराव आळवेकर, 'जिल्हा परिषदेचे माजी सभापती हंबीरराव पाटील , विजय खोत , उपसचिव मंत्रालय भगवान सावंत ,सेवानिवृत्त अर्थसचिव सुरेश गायकवाड, उद्योगपती यशवंतराव पाटील, उद्योगपती धनंजय पाटील, उद्योगपती प्रकाश पाटील, उद्योगपती विनोद चांदे,
मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे, बबनराव गोगावले, निपाणी बाजार समितीचे चेअरमन बाबुराव खोत, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी पंचायत समिती सदस्य अमर खोत, नामदेव पाटील, पांडुरंग पाटील,
वारणेचे वस्ताद संदीप पाटील, पै.अशोक सावंत, संपत पाटील आदींसह वारणा पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्ती मैदानाच समालोचन कुस्ती निवेदक ईश्वरा पाटील व संतोष कुंभार यांनी केले .
दरम्यान कोपार्डे गावचा दिवंगत युवा पैलवान सुशांत आरंडे याच्या स्मरणार्थ स्थानिक विजयी मल्लांना पारितोषक देण्यात आले. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेऊन हे कुस्ती मैदान पार पाडले .
चौकट- *सदर कुस्ती मैदान राष्ट्रकुल विजेते पैलवान राम सारंग सर व कुस्ती हेच जीवन ची टीम शाहूवाडी तालुकाध्यक्ष अशोक सावंत व उपाध्यक्ष संपत पाटील व इतर मान्यवरांनी जोडले होते*.
फोटो ओळी: कोपार्डे येथे प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना राजु शेट्टी, बाबासाहेब पाटील,
करणसिंह गायकवाड,राम सारंग, शामराव कारंडे, बाजीराव कळंत्रे, विजय कारंडे, बाळासो पाटील, विक्रम चौगुल यांच्यासह मान्यवर व यात्रा कमिटी पदाधिकारी
Comments
Post a Comment