गोरक्षनाथ यात्रेनिमित्त ३२, शिराळा येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
*मौजे ३२ शिराळा (ता शिराळा) याठिकाणी होणार भव्य कुस्ती मैदान*
---------------------
१६ एप्रिल कामिनी एकादशी पासून ते शनिवार दि. २२ एप्रिल अक्षय तृतीयेपर्यंत गोरक्षनाथांची यात्रा भरणार आहे. पूर्वी शिराळा पेटा म्हणून ओळखले जाणारे हे गाव अलीकडे 32 शिराळा म्हणून ओळखले जाते. *खऱ्या अर्थाने गोरक्षनाथांमुळेच हे गाव प्रसिद्ध झाले*. तसा या गावचा इतिहास फार मोठा आहे. गोरक्षनाथ महाराजांनी शिराळाभूमीत वास्तव्य करून ही भूमी पावन व पवित्र केली. खऱ्या अर्थाने *छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा या भूमीवर आपले पवित्र पाय ठेवून या शिराळा नगरीला एक वेगळी ओळख दिली*. त्याचबरोबर अनेक मातब्बर पैलवान याच शिराळाच्या मातीत तयार झाले. खऱ्या अर्थाने गोरक्षनाथांच्या कृपेने या शिराळा नगरीत जिवंत नागाची पूजा होऊ लागली भारत देशात तसं जिवंत नागाची पूजा करणारे एकमेव ३२ शिराळा म्हणून प्रसिद्ध झाले. शिराळा तालुक्यात पहिली यात्रा कुसाईवाडी येथील कुसाई देवीची असते, व सांगता 32 शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रेने होते. ३२ शिराळ्याला तशा दोन यात्रा होतात, त्याही जगप्रसिद्ध एक म्हणजे नागपंचमीची आणि दुसरी गोरक्षनाथाची. या दोन्ही यात्रेंना संपूर्ण तालुक्यातील लोक मोठ्या भक्ती भावाने येत असतात. त्यामुळे संपूर्ण शिराळानगरी दुमदुमून गेलेली असते. गोरक्षनाथ यात्रेला खास करून एक वेगळे महत्त्व आहे. अनेक नातपंथीय, वारकरी, शिवाय भाविक भक्त मोठ्या संख्येने गोरक्षनाथ यात्रेमध्ये सहभागी होतात. ही यात्रा आठ दिवस चालते. या यात्रेमध्ये खेळणी, मोठमोठाले पाळणे, मेवा मिठाई यांची अनेक प्रकारची दुकाने असतात. *गोरक्षनाथ यात्रा तालुक्यातील तशी भव्यदिव्य यात्रा म्हटलं तर वावगं ठरणार नाही*. यात्रेच्या शेवटच्या दिवशी मात्र तालुक्यातील सर्वात मोठे कुस्ती मैदान घेतले जाते. नाथाच्या मैदानात कुस्ती करणे म्हणजे पैलवानांना पैलवानकिचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. या यात्रेचा मान तसा गोरक्षनाथ मंदिरातील मठाधिपतींना असतो. *महायोगी श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या यात्रेनिमित्त शिराळा येथे मंगळवार दि. १८ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
▪️नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे 👇
1️⃣ प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी, *पैलवान सिकंदर शेख*, कोल्हापूर विरूद्ध पंजाब केसरी, *पैलवान प्रविण कोली (पंजाब)* यांची लढत होणार आहे*
2️⃣द्वितीय क्रमांकाची कुस्ती, **पैलवान माऊली जमदाडे* (कोल्हापूर) विरूद्ध *अल्ली मेहरी* (इराण) यांच्यात होणार आहे
3️⃣तृतीय क्रमांकाची कुस्ती *पैलवान शैलेश शेळके*,( पुणे) विरुद्ध *पैलवान रोहील चौधरी* (अमृतसर) अशी होणार आहे.
4️⃣चतुर्थ क्रमांकाची कुस्ती *पैलवान अक्षय शिंदे* (शिराळा) विरुद्ध पैलवान *सीमा कोली* (पंजाब) अशी लढत होणार
5 पाचव्या क्रमांकाची कुस्ती *पैलवान कृष्णात नांगरे* (शिराळा) विरूद्ध *पैलवन कृष्णा लवटे* (कोल्हापूर) अशी लढत होणार.
असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
*मठाधिपती पारसनाथ महाराज, आनंदनाथ महाराज, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक, माजी सरपंच देवेंद्र पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, हे प्रमुख उपस्थित राहणार असून* हनुमान तालिम मंडळ व शिराळा ग्रामस्थांच्या वतीने सदर कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी माजी सरपंच प्रमोद नाईक, रणजितसिंह नाईक, संचालक उत्तम निकम, माजी नगरसेवक केदार नलवडे, राजसिंह पाटील, माजी पंचायत समिती सदस्य लालासाहेब तांबिट, कामगार केसरी पैलवान अभिजित शेणेकर, सचिनकाका नलवडे आदी उपस्थित होते.
संयोजकांच्या वतीने *सदर कुस्ती मैदानला हजारो च्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे*.
-------------------
धन्यवाद✍️
*पै मनोज मस्के* पत्रकार
कुस्ती हेच जीवन,
अध्यक्ष शिराळा तालुका
9890291065
Comments
Post a Comment