कृतज्ञता आणि प्रेम... दोन गावांतील मनाला भिडणारे दोन कार्यक्रम
कृतज्ञता आणि प्रेम... दोन गावांतील मनाला भिडणारे दोन कार्यक्रम - मधुकर भावे महाराष्ट्रातील आजच्या अस्वस्थ वातावरणात २३ एप्रिल आणि २४ एप्रिल या दोन दिवशी दोन खेड्यांत झालेले कार्यक्रम मनाला भिडून गेले. २३ एप्रिलचा कार्यक्रम पाटण तालुक्यातील मरळी गावचा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीचा. अनुभव असा आहे की, महाराष्ट्रातील विविध विभागातील मोठ्या नेत्यांचे जयंती किंवा पुण्यतिथी कार्यक्रम जोरात साजरे होतात... पण प्रामुख्याने सभा, भाषणं... आदरांजली... पुतळ्याला पुष्पहार किंवा समाधीला पुष्पचक्र... अशा मर्यादित स्वरूपातच हे कार्यक्रम साजरे होत असतात. मरळी येथील बाळासाहेब देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सहभागी होताना एक विलक्षण अनुभूती आली. पुण्यतिथीचा दिवस २३ एप्रिल. पण गेली १५ वर्षे २० एप्रिलपासून पुण्यतिथीचा ‘कृतज्ञाता कार्यक्रम’ अखंडपणे सुरू आहे. कोणाचेही भाषण नाही... प्रत्येक वर्षी २० एप्रिलला सुरू होणारा पारायण सोहळा... तीन दिवस चालतो. मग दिंडी यात्रा... त्या दिंडीत ज्ञाानेश्वर महाराजांची प्रतिमा... ‘ग्यानबा-तुकाराम’ चा गज...