*कुस्तीच्या आखाड्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शड्डू पैलवानकीचा*......

*कुस्तीच्या आखाड्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शड्डू पैलवानकीचा*......

*पैलवान प्रदिप माने वाढदिवस विशेष*....... 
✍️शब्दांकन 
मनोजकुमार मस्के 
मांगरुळ...... 

शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावातील कुस्तीचं वादळ व हुकमी *कुस्तीचं मैदान गाजवणारा एक झंजावत पैलवान... प्रदीप माने*...... मैदानात जरी नाव घेतलं तरी समोरच्या पैलवानाच्या छातीचा  ठोका चुकत असे असा हा ढाण्या वाघ एकाच मिनिटात समोरच्या पैलवानाला चारी मुंड्या चीत करून *प्रदीप माने शिराळा तालुक्यातील एक नामवंत पैलवान म्हणून ओळखू लागला*... वारणा पंचक्रोशीत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली अनेक प्रेक्षक खास करून प्रदीपचीच कुस्ती पाहायला येत असे. अलीकडील दोन वर्षात प्रदीपने कुस्ती सोडून व्यावसायाकडे लक्ष दिले आहे . त्याच्या व्यवसायात त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याची पत्नी विजया माने हीची त्याला चांगली साथ मिळत आहे.  
 नुकत्याच  झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रदीपने दिमागदार एन्ट्री केली आणि जबरदस्त मताधिक्याने तो निवडून ही आला आहे ... तसं पाहिलं तर माने घराण्याला पूर्वीपासूनच देश सेवेचा वारसा आहे. प्रदीपचे पंजोबा *शंकर भाऊ चांभार हे बिळाशी सत्याग्रहाच्या वेळी इंग्रजांच्या गोळीबारात शहीद झाले होते*. त्यांच्यासोबत धोंडी संतु कुंभारही होते. हाच वारसा पुढे चालवत प्रदीप राजकारणात उतरला....
    मांगरूळच्या माने कुटुंबात जन्मलेला हा प्रदीप वडील गरीब असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी आईवर होती. त्यातच प्रदीपला शाळेची आवड कमी.. म्हणावी अशी काही प्रगती शाळेत नव्हती... आणि तालमीची आवड जास्त असल्याने लहानपणी गावच्या तालमीत प्रदीप लढायचा, बऱ्यापैकी कुस्त्या करतोय असं दिसल्यानंतर त्याला *मांगरूळचे नॅशनल चॅम्पियन पैलवान संजय खांडेकर* यांनी 'जाणता राजा कुस्ती केंद्रात' दाखल केले. ईतरांची जेवणे करत, सांगेल ते काम करत प्रदीप पैलवानकीचे एक एक डाव शिकत होता... बघता बघता वारणपट्ट्यात प्रदीपच्या चांगल्याच कुस्त्या होऊ लागल्या. दररोज एकतरी कुस्ती जत्रेच्या आखाड्यात असल्याने त्याला बऱ्यापैकी पैसे मिळत गेले. पुढे इस्लामपूर येथील *जाधव आखड्यात प्रदीप राहु लागला*...आपला खर्च भागवत पैसे कमवत प्रदीप कुस्त्या करत असे... कुस्त्यांचे जीवावर प्रदीप स्वतःचा खर्च चालवत असे  त्याचबरोबर थोडाफार हातभार कुटुंबालाही लावत असे. 
     अलीकडे त्याने कुस्तीचे आखाड्यातून थेट राजकीय आखाड्यात उडी मारली आणि गावच्या समाजसेवेला सुरुवात केली यामध्ये त्याची पत्नी विजया हिने ही प्रदीपच्या पाठीशी खंबीर उभा राहून त्याला साथ दिली. यापुढे कुस्तीच्या आखाड्यातील वाजणारा शड्डू आता ग्रामपंचायतीच्या आखाड्यात विकासाच्या दृष्टीने चांगलाच घुमेल अशी आशा अनेकांना आहे.

आज प्रदिप चा वाढदिवस आहे त्याबद्दल त्याला *वाढदिवसाच्या या छोटय़ाशा शब्दरुपी शुभेच्छा*...
-------------------
धन्यवाद
*पै मनोज मस्के* पत्रकार, 
अध्यक्ष कुस्ती हेच जीवन, शिराळा तालुका
9890291065

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*