*असं हवेत आपटल्यावर कुस्तीत 4 गुण मिळतात हे माहीत नसेल का?*

*#कुस्ती*
*असं हवेत आपटल्यावर कुस्तीत 4 गुण मिळतात हे माहीत नसेल का?*
*पै.महेंद्र गायकवाड व पै.सिंकदर शेख यांच्या लढतींमध्ये खांद्याकडुन पाठीकडे 90 अंशांपेक्षा कमी पोझिशन मध्ये जर एखादा कुस्तीगीर आकाशामधुन घुडगे न टेकता सरळ जमिनीवर पडला तर ती एक्शन 4 पॉइंटची होते.*
*जाणीवपुर्वक धर्म मध्ये आणुन पै.महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षेच्या मेहनतीवर पाणी फिरवायचे काम मराठी मीडिया करत आहे.*

*सर्व पैलवान हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतात व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय नियमांन नुसार होते, त्यामुळे कुठलाही खेळ म्हटलं की त्यात हार जित होत असतेच, सिकंदर दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून जाणून बुजून या मुद्द्याला रंग देण्याचं काम विशिष्ट पक्ष व ठराविक मराठी न्यूज नेटवर्क करत आहे, खेळाला जातीय धर्माचा रंग देऊन त्याला कृपया गालबोट लावू नका.*

*नीट बघितला तर लक्षात येईल की सिकंदरला महेंद्रने तोब्या सारखा फिरवून टाकला आहे.*

*टीप - दुर्दैव या गोष्टीचं वाटत की ज्या पैलवानाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली आहे त्या पैलवानाला मराठी मीडिया ने साफ दुर्लक्ष केलंय.*

*६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी ठरलेल्या पैलवान श्री शिवराज राक्षे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!*
*पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.!*

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*