पवार साहेब महाराष्ट्राची कुस्ती तुम्हीच वाचवू शकता...
पवार साहेब महाराष्ट्राची कुस्ती तुम्हीच वाचवू शकता... महाराष्ट्राची कुस्ती देशात नेतृत्व करणारी हवी अशी योजना करावी मुलांनी मैदाना बरोबरच स्पर्धा खेळणं खूप गरजेचं आहे. आणि ते खरेही आहे. खरं पाहिलं तर कुस्ती खेळणारे हे अनेक देश आहेत, त्यात आपल्या देशात महाराष्ट्रात कुस्तीचे बऱ्यापैकी आखाडे भरले जातात. आज विचार केला तर १६ देश क्रिकेट खेळतात आणि २०० देश कुस्ती खेळतात. तरीसुद्धा भारतात कुस्ती पेक्षा क्रिकेटला जास्त पसंती दिली जाते. पूर्वी कुस्तीला मान होता. शिवाय महाराष्ट्रातील मल्लांना देशात विदेशात ही मान होता. ज्या ज्या वेळी दिल्लीवरून पैलवान कुस्तीसाठी महाराष्ट्रात आला त्या- त्या वेळी महाराष्ट्रात मात्र चारी मुंड्या चीत होत होता, हे कुण्या ज्योतिषाने सांगायची गरज नाही. महाराष्ट्राच्या मल्लांनी देशात नव्हे तर विदेशात सुद्धा कुस्ती मध्ये चांगलं नाव केलेलं होतं. महाराष्ट्राच्या पैलवानाची भीती दिल्ली हरियाणापर्यंत होती. परंतु आज या महाराष्ट्राची कुस्ती कुठेही दिसेनाशी झाली. या महाराष्ट्रात अनेक कुस्ती संघटना आहेत. ...