*शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा चिंचोलीत*

*शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा चिंचोलीत*
मांगरूळ- वार्ताहर 
शिराळा तालुक्यात राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेंना सुरुवात झाली असून, दि. २४ रोजी शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता चिंचोली येथील मराठी शाळेत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कोकरूड पोलीस स्टेशनचे पीआय ज्ञानदेव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या काळात दोन वर्षे विद्यार्थ्याना क्रीडा स्पर्धांना मुकावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी नाराजी पसरली. कोरोनाची परिस्थिती निवळली असल्या कारणाने शासनाने शाळास्तर, प्रकल्प स्तर, विभाग स्तर व राज्य स्तर स्पर्धाचे आयोजन केले आहे. या काळात कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, कुस्ती व ईतर मैदानी खेळांच्या स्पर्धाचे आयोजन सर्व स्तरावर करण्यात आले आहे.
शिराळा तालुक्यातील कुस्ती स्पर्धा या चिंचोली येथील मराठी शाळेच्या पटांगणावर होत आहेत. या स्पर्धेसाठी शिराळा तालुक्यातून अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला आहे. जवळपास 200 च्या वर विद्यार्थी कुस्ती स्पर्धेसाठी उतरलेली आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन कोकरूड पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानदेव वाघ साहेब, एन. पी. पाटील सर, वर्णे सर, नलवडे सर, रोकडे सर, आर पी पाटील सर, पाटील सर, कुलकर्णी सर, पैलवान धनाजी महाडिक सर, प्रथमेश झेंडे सर, संजय पाटील सर, खवरे सर, सुनील पाटील सर, इत्यादींनी केले . स्पर्धेचे आयोजन क्रीडा माधव विद्यालय गुडे यांनी केले. त्याचबरोबर स्पर्धेत यशस्वी व शिस्तबद्ध खेळ करण्यासाठी शपथ देण्यात आली. त्यामुळे शाळेचे वातावरण क्रीडामय झाले होते. सर्व विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फार मोठा आनंद निर्माण झाला होता.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*