लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर परीक्षेत नम्रता मस्के राज्यात पहिली
लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर परीक्षेत नम्रता मस्के राज्यात पहिली
मनोजकुमार मस्के- मांगरूळ
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) च्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) मुख्य परीक्षेत शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावची नम्रता ज्ञानदेव मस्के हिने मुलींच्या मध्ये राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे तर मंत्रालय साह्यक म्हणून राज्यात आठवा क्रमांक मिळविला आहे. एकाच वेळी दोन्ही परीक्षेमध्ये राज्यात येणारी ही मांगरूळ मधील पहिलीच मुलगी आहे.
नम्रता चे पहिलीपासूनचे शिक्षण हे मांगरूळ मध्ये मराठी शाळेत व माध्यमिक शाळेतच झाले. घरची परिस्थिती हलकीची, वडील शेतकरी, आई गृहीणी. नम्रताला अजून एक जुळी बहीण आहे श्रद्धा. या दोघी बहिणी घरातील काम आटपून नालंदा अभ्यास केंद्रात अभ्यास करत असत. खऱ्या अर्थाने अनेक अधिकारी यांच अभ्यास केंद्रातूनच घडले. या नालंदा अभ्यास केंद्राची स्थापना दीपक कांबळे (डी वाय एस पी) सिंधुदुर्ग पोलीस यांनी केली आहे.
आपल्या दोन्ही मुली मुलाप्रमाणे सांभाळणारे नम्रताचे वडील हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. शेतीच्या उत्पन्नावरच आपल्या दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना राज्य लेव्हलच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन करणारे त्यांचे वडील हेच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहेत.
एका गरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यश प्रधान करू शकते व राज्यात मुलींच्या मध्ये प्रथम क्रमांक मिळविते हे ग्रामीण भागातील मुला व मुलींच्या साठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. सध्या नम्रताने यश प्राप्त केले यामध्ये तिच्या आई-वडिलांचे कष्ट व तिची मेहनत या गोष्टी ती प्रामुख्याने सांगते. एका सर्वसामान्य कुटुंबातून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन राज्यात पहिले येणं ही खूप मोठी गोष्ट नम्रता साठी आहे.
आपली दुसरी ही मुलगी श्रद्धा ही ही याच पद्धतीचे यश खेचून आणेल असा ठाम विश्वास तिच्या वडिलांनी बोलताना सांगितला.
Great History 👍👍👍👍👍👍
ReplyDelete