*कुस्तीतील चक्रीवादळ पैलवान आनंदराव धुमाळ* खास लेख

 
*कुस्तीतील चक्रीवादळ पैलवान आनंदराव धुमाळ*
पै.आनंदा धुमाळ कुस्तीतील एक तुफाणी मल्ल , अनेकांना धुळ चारत चारी मुंड्या चित करत, भारत सरकारचा  युवा गौरव पुरस्कार विजेते ते भारतीय रेल्वेचे प्रशिक्षक ईथपर्यंत मजल मारणारे कुस्तीतील जादुगर पै. आनंदा धुमाळ
     घरची परिस्थीती हलाखीची असल्याने खुराकाची कमतरता कायम भासली. पै.धुमाळ वस्तादांचे गाव शिराळा तालुक्यातील एक छोटेशे खेडेगाव पणुंब्रे. या गावातच त्यांची कुस्तीला सुरवात झाली. घरी दुभती जणावरं असल्याने दुध हा त्यांचा खुराक बनला. 
       धुमाळ वस्तादांचे चुलते पैलवान होते. वयाच्या पाच वर्षापासूनच चुलते आनंदा धुमाळ यांना आपल्याबरोबर गावयात्रेंच्या फडावर नेत असत. तिथेच त्यांना कुस्तीची आवड लागली. हे पोरगं चांगल्या कुस्त्या करत असल्याचे गाववाल्यांच्या पण  लक्षात आले . साधारन १९५९-६० तो काळ असेल. भागात उत्कृष्ट कुस्ती करणारा पैलवान म्हणून आनंदा धुमाळ हे नाव लौकीक होऊ लागले. 
      कही वर्ष गावाकडेच कुस्त्या करत नावलौकीक मीळवलेले आनंदा धुमाळ यांना गरज होती ती काहीतरी करून दाखवन्याची. त्यातच त्यांचे नातेवाईक मांगरुळ गावचे शिवछत्रपती विजेते पै.शिवाजीराव मस्के यांनी धुमाळ सरांना मुंबईला बोलवुन घेतले आणि १९७४ साली रेल्वेची ट्रायल देऊन रेल्वेत सेवा करण्याची संधी उपल्ब्द करुन दिली. त्यावेळचे रेल्वेचे वस्ताद मुरलीधरजी पांडे साहेब हे होते.
       रेल्वेत निवड झाल्यानंतर १९७७ ला चाळीसगावला सर्वउत्कृष्ट खेळाडू म्हणून धुमाळ सरांनी नाव लौकीक केले. सर्वच्या सर्व कुस्त्या अवघ्या तिनच मिनीटात चितपट कुरुन सुवर्णपदक मिळवल्याने पै. आनंदा धुमाळ यांचे महाराष्ट्रभर नाव झाले. त्यावेळचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणिय शरद पवर साहेब यांनी त्यांना मुंबईत घर भेट दिले. त्यानंतर जवळजवळ १९ वेळा त्यांनी   सुवर्ण, रौप्य यासारखी अनेक पदकं महाराष्ट्राला दिली.  स्वर्गिय वसंतदादा मुख्यमंत्री असताना. पै. आनंदा धुमाळ  हे दादांचे अशिर्वाद घेण्यासाठी गेले असता दादांनी पै. आनंदा धुमाळ यांना ६०० स्के. फुटचा रुम भेट देऊन महाराष्ट्राच्या लाल मातीचा गौरव केला. 
        १९८६-८७ ला पटीयाला येथे NIS कोच साठी हजार  स्पर्धका मधुन दहा पैलवान निवडण्यात आले. त्या दहा मध्ये पै. आनंदा धुमाळ सर यांचा देखील सामावेश होता. १९८८ साली अंतरराष्ट्रीय कुस्ती कोच म्हणुन ते परिक्षा पास झाले. त्यानंतर ते भारतीय रेल्वेचे कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.  त्यानंतर मुंबई शहर तालीम संघाचे त्यांनी बरेच वर्ष काम पाहीले. त्याच बरोबर मुंबई उपनगर तालीम संघाचे त्यांनी उत्कृष्ट रित्या काम पाहीले. अनेक मल्ल रेल्वेत सामावुन घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले किंबहुना रेल्वेत खेळाडू म्हणून सामाविष्ट केले. त्याच बरोबर २०१० ला त्यांना भारत सरकारने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले  
         पै. आनंदा धुमाळ यांचे वय ६८ वर्ष झाले आहे. आज सुद्धा ते अनेक मैदानात आपली हजेरी अवर्जुन लावतात.  प्रत्येक मैदानात एक नंबरच्या कुस्तीला ते पंच म्हणून काम पाहात असतात. आज त्यांनी कुसतीलाच आपले जीवन मानले आहे. या वयात सुद्धा त्यांनी कुस्ती बरोबर आपली तब्बेत खुपच व्यवस्थित जतन केली आहे. आशा या तुफानी मल्लास १०० वर्षाचे आयुष्य लाभो हीच प्रार्थना. 

धन्यवाद !
मनोजकुमार मस्के (पत्रकार)
शिराळा तालुका अध्यक्ष
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य
९८९०२९१०६५

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*