*कुस्तीचा दानशुर कर्ण* डी. आर. जाधव (आण्णा) वाढदिवस

 
*कुस्तीचा दानशुर कर्ण*

भारतीय शैली कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष *मा.डी. आर.(आण्णा) जाधव* यांचा  वाढदिवस 2 जून रोजी येत असून  महाराष्ट्राच्या लाल मातीला मिळालेला एक आश्रयदाता. आणि  ग्रामीण भागातील एक दानशुर आणि दानतदार व्यकतीमत्व म्हणजे डी. आर. जाधव आण्णा.
  एका गरीब कुटुंबातील व्यक्ती ज्या कुटूंबाला एकवेळ खायचे वांदे होते. त्याच कुटुंबात एक कर्णासारखा दानशुर पुत्र ज्या मातेच्या पोटी जन्माला आला त्यांचे नाव *डी. आर. जाधव आण्णा,* आपली पूर्वीची गरीबी सांगत आसताना आई वडीलांनी केलेले काबाडकष्ट आठवून भाऊक झाले. आणी एवढ्या महान शिखरावर पोहोचलेल्या आण्णांच्या डोळ्यात पाणी आले.  
       आण्णांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण शिराळा, शाहुवाडी, कराड तालुक्यातून आण्णांच्यावर प्रेम करणारी मंडळी आण्णांना शुभेच्छा देत आहेत.  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुठेकमी ट्रकभर शाली, फेटे, हार बुकेंचा ढीग जमा झाला. एवढं प्रेम करणारी मित्र परीवार आज महाराष्ट्रभर आहे. हे दृश्य पाहून आण्णांच्या बंधु व चुलत्यांचा मनाचा बांध आपोआप फुटला. थोरल्या बंधूंना तर बोलत असताना पूर्वीची गरीबी सांगताना अश्रूंना आवर घालने कठीण जात होते.  लोकांच एवढ प्रेम आपल्या कुटुंबावर पाहून डोळ्यातल्या धारा टपाटप पडू लागल्या तोंडातून शब्द पडेनाशे झाले. लहानपणी कधीकधी ऊपवासी झोपावं लागणाऱ्या आपल्या लेकरांना. आज समाजात एवढी प्रेम करणारी माणसं पाहून आईचे ऊर भरून आले होते. 
      आण्णांनी यशाचं शिखर गाटलं पण पाय नेहमी जमीनीवरच ठेवले होते. आण्णा आपली गरीबी सांगत होते. चिपट्या कोळव्याने गावातील लोकांनी मदत केली. वडीलांनी पाहुनेरावर जावून स्वतः उपाशी राहून आम्हा भावंडांना खाऊ घातलं. हे सांगत असताना मात्र आण्णा स्वतःला आवरू शकले नाहीत. आण्णांच्या डोळ्यात पाणी आले होते.
   आण्णां सांगत होते. की स्वर्गीय वसंत दादांनी आण्णांना जवळ केले. पोलीसात नोकरी लागली.  नंतर एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पहीलं  काम मिळाले ते गटार साफ करण्याचे. त्यावेळी अनेकजण जेष्ठा करत होते. पण गरीबीतून आलेल्या आण्णांना आत्मलींगाच्या कृपेने यश मिळत गेले. आणी आज आण्णा सर्वांचे आवडते झाले. आण्णांनी आवर्जुन सांगीतले की मी माझ्या आयुष्यात कधीही कुणाला उलट बोललो नाही. आणि जर माझ्या तोंडून एका व्यक्तीला जरी उलटा शब्द गेला असेल तर त्यांनी सांगाव असं चॅलेंज केले. खरंच आण्णा कधीच कुणाला उलट बोलत नाहीत हे मात्र खरं आहे. 
    आज आण्णा  भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. आण्णांचे कार्य फार मोठे आहे. उपाध्यक्ष पदाची एवढी मोठी धुरा अण्णा लिलया पेलत आहेत  गरिबीमुळे कुस्ती खेळता आली नाही. पण आण्णांच्या दानशुरपणामुळे महाराष्ट्रात कुस्तिला दिवस चांगले आलेत. आण्णांनी अनेकांना सर्वप्रकारची मदत केली आहे. अनेक पैलवानांचा खुराकाचा खर्च आण्णा स्वतः करतात . भागातील प्रत्येक मैदानात आण्णा खास मुंबई वरुन आवर्जून उपस्थित असतात. अनेक गावांना आण्णांनी कुस्ती आखाडे बांधुन दिले. कुस्ती टीकावी म्हणुन सतत प्रयत्न केले. 
    आण्णा काही राजकारणी नाहीत. पण राजकारण्यांना लाजवेल एवढ मोठ काम आण्णांच आहे. समाजात पैसा कमवणारी माणसं, माणूसपण विसरतात हे आम्ही पाहीले आहे.  पण आण्णांच्या बाबतीत पैसा आणि सत्ता ही आवळाच्या पाणावरल्या पाण्याच्या थेंबासारखी आहे. ते कधीही जाऊ शकते.  पण कमावलेली माणसं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बरोबर राहू शकतात असं आण्णांचं ठाम मत आहे. चारी भावंडे त्यांच्या चिंचोली या मुळ गावी मिळुन मिसळून राहतात.         
  आज ग्रामीण भागातील अनेक लोकं  आण्णांच्याडे मदतीच्या आशेने जातात. आण्णा त्यांच्या परीने जी मदत करता येईल तेवढी मदत करतात. लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आपल्या मुलाला पाहणारी आण्णांची आई परमेश्वराला सांगते. कर्णासारखा दानशुर पुत्र माझ्या पोटी जन्माला घातलास देवा असाच पुत्र प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा.
     आज वाढदिवसाच्या यशाचा आणी आशीर्वादाचा हार आपल्या मुलाच्या गळ्यात घालत असताना आई आत्मलिंग देवाला हात जोडून सांगत होती.  आसाच पाठीशी राहा माझ्या लेकरांच्या.........  
आण्णांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
•••••••••••••••••••••••••••••
             धन्यवाद
-संकलन -: *मनोज मस्के*  (पत्रकार) 
शिराळा तालुका अध्यक्ष 
*कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य* 
फोनः-  9890291065

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*