महाराष्ट्रातील जनतेला किती गृहित धरून चालतात बघाआता २०४७ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री!
महाराष्ट्रातील जनतेला किती गृहित धरून चालतात बघा आता २०४७ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! महाराष्ट्रातील राजकीय तमाशाचे दोन अंक अगदी व्यवस्थित पार पडले आहेत. ६ महिन्यांपूर्वी या तीन अंकी तमाशाची ‘संहिता’ ठरली होती. त्यानुसार २ अंक व्यवस्िथत झाले. त्यातील पहिला अंक होता राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव करण्याचा... हा पराभव आघाडीच्या गाफीलपणामुळे, अतिविश्वासामुळे पराभव आघाडीने ओढवून घेतला. शिवाय एका शिवसैनिकाला संधी देवून त्याचाच पराभव झाल्यामुळे तिथेच असंतोषाचा स्फोट झाला. हे होणे अपरिहार्य होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही एका उमेदवाराचा पराभव होणार, हे स्पष्ट िदसत असताना, पेपरबाजी करून... ‘महाविकास आघाडी विजयाबद्दल निवांत... भाजपमध्ये अस्वस्थता...’ अशी भंपक हेडींग ‘सामना’ने दिली. परिस्थितीची जाणीव नव्हती. िकंवा अित शहाण्या लोकांच्या हातात परिस्थिती गेली होती. त्यामुळे ‘दुसरा अंक’ भाजपाने व्यवस्थित निभावून नेला. यामध्ये भाजपाचे श्रेय कमी आिण महाआघाडीतील दीड शहाण्यांचे श्रेय जास्त होते आिण आहे! उद्धव...