संग्रामसिंह पाटील व संगीता पाटील यांची एसबीआय लाइफ इन्शुरन्स तर्फे हाॅंगकाॅंग साठी निवड.
संग्रामसिंह पाटील व संगीता पाटील यांची एसबीआय लाइफ इन्शुरन्स तर्फे हाॅंगकाॅंग साठी निवड.
मनोजकुमार मस्के - चिखली
एसबीआय लाइफ इन्शुरन्स या संस्थेमार्फत जेओटीसी या लेव्हलचा बिजनेस पूर्ण केल्यामुळे कृष्णराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन संग्रामसिंह पाटील व पत्नी संगीता पाटील यांची हाॅंगकाॅंग दौऱ्यासाठी साठी निवड करण्यात आली आहे.
अल्पावधीतच अनेक ठेवीदारांच्या व कर्जदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था या संस्थेच्या माध्यमातून एसबीआय लाइफ इन्शुरन्स तर्फे कर्जदारांना विमा संरक्षण देण्यात येते. या विमा संरक्षणाचा अनेक ग्राहकांना फायदाही झाला आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्स मार्फत असलेल्या या योजनेमध्ये अत्यंत कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त विमा ग्राहकांना मिळत असल्याने अनेकांची यासाठी पसंतीही आहे. एसबीआय सारखी चांगली कंपनी असल्याने अनेक लोकांनी स्वखुशीने आपली गुंतवणूक ही एसबीआय लाइफ इन्शुरन्स च्या माध्यमातून केली. व जेओटीसी या लेवल चा बिजनेस जवळपास 30 लाखाच्या आसपास कृष्णराव पाटील चेअरमन संग्रामसिंह पाटील व संगीता पाटील यांच्याकडून देण्यात आला. त्यामुळे एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी तर्फे संग्रामसिंह पाटील व संगीता पाटील यांना हाॅंगकाॅंग दौर्यासाठी निवडण्यात आले.
हाॅंगकाॅंग दौर्यासाठी निवड झाल्यामुळे हॉटेल साई निसर्ग या ठिकाणी संग्राम पाटील यांचा सत्कार घेण्यात आला. यावेळी केक कापून ट्राॅफी ही देण्यात आली. यावेळी एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे डिव्हिजनल सेल्स मॅनेजर विजय वाघ सीनियर एजन्सी मॅनेजर सोमनाथ पाटील , कृष्णराव पाटील पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment