ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस तथा ठाणे शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष मा रमाकांत पाटील सर वाढदिवस विशेष*.....
*ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस तथा ठाणे शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष मा रमाकांत पाटील सर वाढदिवस विशेष*.....
मा रमाकांत पाटील सर हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील असुन त्यांनी पहिल्या पासुन कुस्तीवर प्रेम केले आहे.
थोर स्वातंत्र्यसेनानी ठाणे जिल्हा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्वेसर्वा दिवंगत आदरणीय यशवंतराव ठाणेकर यांचे पहिल्या पासुनचे मा रमाकांत पाटील सर हे निष्ठावंत व विश्वासू शिलेदार होते. ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वाढीसाठी त्यांनी *आदरणीय यशवंतराव ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली* खांद्याला खांदा लावून काम केले आहे. शिवाय आदरणीय यशवंतराव ठाणेकर यांच्या सोबत कॉंग्रेस पक्षाचे त्यांनी तन मन धन हरवून काम केले आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून आदरणीय यशवंतराव ठाणेकर आणि मा सुरेशभाई ठाणेकर यांनी त्यांना ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या कार्यकारीणीवर काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.
मध्यंतरीच्या काळात ठाणे शहर व जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष, उत्कृष्ट कबड्डीपटू व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सदस्य, समर्थ व्यायामशाळा कोपरी ठाणे चे अध्यक्ष, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन चे सदस्य,आता ठाणे शहर तालीम संघाचे महाराष्ट्र राज्यावरती प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील नामांकित आदी माजी मल्ल त्यांच्या या कार्यपद्धतीवर खुष असतात.
अशा अनेक जबाबदार्या त्यांनी आपल्या कुशल बुद्धिमत्तेच्या जोरावर पेलल्या आहेत.
आदरणीय कै यशवंतराव ठाणेकर मा सुरेशभाई ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. कै वसंत बापट, कै बी जी पाटणकर,आण्णा पाटणकर,अशा अनेक मंडळी ने खुप मेहनत घेतली होती.
तसेच या सर्व मंडळीनी ठाणे जिल्हा कुस्तीगीर भवन बांधण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून ठाणे शहरात एक अद्ययावत अशी *कुस्तीगीर भवनाची वास्तु बांधली*.
शिवाय ठाणे महापौर चषक स्पर्धां मध्यंतरीच्या काळात बंद पडली होती ती ठाणे महापालिका दरबारी पाठपुरावा करून मानाची ठाणे महापौर चषक स्पर्धां पुन्हा चालू करण्यात मा रमाकांत पाटील सर यांचा मोठा वाटा आहे.
मा रमाकांत पाटील सर आता *आदरणीय अध्यक्ष सुरेशभाई ठाणेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वाढीसाठी सतत झटत असतात, *शिवाय ठाणे महापौर चषक स्पर्धा घेऊन ती पार पाडण्यासाठी मा रमाकांत पाटील सरांचा खुप मोठा वाटा असतो*.
त्यांच्या आजच्या या *वाढदिवसाच्या निमित्ताने या त्यांना छोट्याशा शुभेच्छा*.
▪️माहिती सौजन्य-
ऑल इंडिया चॅम्पियन
*पै रंगराव पाटील* (पेरीडकर)
-------------------------------
धन्यवाद
✍️ *पै अशोक सावंत /पाटील*
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य
Comments
Post a Comment