हॉटेल साई निसर्ग यांनी शिवभक्तांना दिला नाष्टा..

हॉटेल साई निसर्ग यांनी शिवभक्तांना दिला नाष्टा..

हॉटेल साई निसर्ग मोरेवाडी येथे शिवजयंती ऊत्साहात साजरी. युगपूरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती  साजरी करण्यात आली. प्रारंभी हॉटेल साई निसर्गच्या सर्व परिवाराने सकाळपासूनच चहा पोहे असा नाष्टा ज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांच्या साठी ठेवला होता. अनेक मंडळे ज्योत घेऊन येत असता त्यांना चहा आणि नाष्ट्याची व्यवस्था हॉटेल साई निसर्ग परिवाराने केली होती. महाराजांनी केलेला संघर्ष उभा केलेले स्वराज्य या सर्वाचा आपणाला कधीही विसर पडू नये. अखंड महाराजांची मूर्ती आठवणीत रहावी व महाराजांच्या वरील प्रेम हे नेहमी असच राहावं या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला होता.   अनेक मंडळांनी  चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला. अनेक मावळ्यांनी हॉटेल साई निसर्ग परिवाराचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. या उपक्रमाचे प्रमूख अतिथी सौ. स्नेहा सावंत, अर्जुन सावंत बाळासाहेब चौगुले, आशिष पवार, ओंकार, अनिल मामा, आनंदा पाटील, उमेश , योगेश, सुवर्णा जाधव , सतिश काटके , अनिल काकडे, आण्णा डीगे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*