मराठी ज्ञानभाषा होईल तो िदवस आपण कधी साजरा करणार?२७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा िदन’.
मराठी भाषा िदन जरूर साजरा करु या.... पण... मराठी ज्ञानभाषा होईल तो िदवस आपण कधी साजरा करणार? २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा िदन’. मराठी काव्यातील महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाला ‘मराठी भाषा दिन’ म्हणून गौरविले गेले. कारण कुसुमाग्रज यांनी १९४२ च्या आॅगस्ट क्रांतीमधील धगधगत्या इितहासाला ‘क्रांतीचा जयजयकार’ या महान कवितेने देशपातळीवर नेले. त्या िदवसाची हकीकत अंगावर काटा आणते. कुसुमग्रज तेव्हा वि. वा. िशरवाडकर होते. पुण्याच्या ‘प्रभात’ दैनिकात ते उपसंपादक होते. वालचंद कोठारी हे संपादक होते. हे िबगरमराठी संपादक कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते. मराठीचे प्रेमी होते. कुसुमाग्रज यांची ‘गर्जा जयजयकार’ ही कविता ७ अॅागस्ट १९४२ रोजी प्रभात दैिनकात छापून आली. पुण्याच्या पोिलसांनी (आताच्या भाषेत ई.डी.) प्रभात दैनिकावर छापा टाकला. चौकशी सुरू केली. ‘कोण कुसुमाग्रज?’.... संपादकीय विभागातील सगळे सदस्य एकमेकांना विचारू लागले... ‘अरे, कोण कुसुमाग्रज?...’ पोलिसांनी संपादकीय विभागचे रजिस्टर तपासले.... कर्मचाऱ्यांची नावे तपासली. तर त्यात कुसुमाग्रज हे नाव कुठेच नव्हते. वि. वा....