मंत्री नव्हे, देवमाणूस- बाळासाहेब थोरात

मंत्री नव्हे, देवमाणूस
७ फेब्रुवारी रोजी बाळासाहेब थोरात ६९ वर्षे पूर्ण करून ७० व्या वर्षात पाउल ठेवित आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, सहकारात ज्या िनष्ठावंत आिण प्रामािणक नेत्यांची इितहासाला दखल घ्यावी लागेल त्यामध्ये बाळासाहेब थोरात हे नाव अत्यंत सन्मानाने िलहावे लागेल. आजच्या राजकारणात िनसरडेपणा आहे.  आजचे राजकारण पैशांभोवती िफरत आहे. आजचे राजकारण िसद्धी ऐवजी प्रसिद्धीसाठी आहे. जाहिरातबाजीसाठी आहे. या सगळ्या अस्वच्छ राजकारणात गेली ३५-४० वर्षे आपल्या पांढऱ्या स्वच्छ पोशाखावर एक डागसुद्धा पडू न िदलेला महाराष्ट्रातील राजकारणी शोधायचा तर बाळासाहेब थोरात या नावाशी येवून थांबावे लागेल. आपला पक्ष, आपली राजकीय भूिमका, सहकारातील आपले काम, सामािजक काम सतत करत रहायचे. यश आपोआप पाठी येईल. या करिता आटापीटा करावा लागणार नाही. लोक लाख डोळ्यांनी पाहतात आिण व्यक्तीचे मूल्यमापन करतात. अशी श्रद्धा ठेवून संयमित भूिमकेने राजकारणात वावरणारे आज दुर्मिळ झालेले आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर बाळासाहेब आहेत. जाहिरातबाजी न करता, पत्रकार परिषदा न घेता, आदळ-आपट न करता, कुणाही विरोधात एकही अपशब्द न बोलता भूमिकेवर घट्ट  राहणारा नेता म्हणून आज शांत आिण तेवढाच िनश्चयी असा बाळासाहेबांचा स्वभाव विलक्षण आहे. दुसऱ्या  अर्थाने कोणत्याही वादात स्वत:ला गुंतवून न घेता आपले काम चोखपणे, प्रामािणकपणे, सामान्य माणसाला मदत करण्याच्या भावनेने आिण आपले मंत्रीपदाचे अिधकार त्याच भावनेने वापरणारे जे थोडे मंत्री आहेत त्यात बाळासाहेब आहेत. 
बाळासाहेब समजून घेण्या आगोदर ते ज्या महान परंपरेतून आलेत त्याग-सेवा-समर्पण ही भाऊसाहेब  थोरात यांची परंपरा... स्वातंत्र्याची चळवळ असो, स्वातंत्र्यानंतर, िमळालेले स्वातंत्र्य कष्टकरी, शेतकरी, सामान्य माणसांसाठी आहे की नाही, या करिता लढा देण्याचा कार्यक्रम असो िकंवा यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने विकास कामात झोकून देवून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची भूिमका असो.... भाऊसाहेबांच्या  या सगळ्या परंपरा बाळासाहेबांनी त्याच िनष्ठेने, त्याच िजद्दीने आिण त्याच प्रामाणिकपणाने आपल्या राजकीय, सामािजक जीवनात सही-सही अंमलात आणल्या. आिण म्हणून भाऊसाहेबांच्या आदर्शावर चालणारा त्यांचा सुपूत्र आज महाराष्ट्राचा राजकारणातील एक घटक ठरला. एवढेच न्ाव्हे तर वैधानिक मंडळात काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व करणारा मुख्यमंत्री आिण उपमुख्यमंत्र्यांनंतर ज्यांचे नाव घ्यावे लागते इथपर्यंत बाळासाहेब पोहोचले ते त्यांच्या कतृत्वावर पोहोचलेले आहेत. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून १९८५ पासून २०१९ पर्यंत झालेल्या आठ विधानसभा िनवडणुकांत सलग प्रचंड मतांनी लोकांनी ज्यांना उचलून धरले तो बाळासाहेबांचा विक्रम नगर िजल्ह््यात तरी अबािधत आहे. सांगोल्यातून गणपतराव देशमुख ११ वेळा विधानसभेत िनवडून आले. पण ते सलग िनवडून आले नव्हते. दोन वेळा त्यांचा पराभव झाला होता. गणपतरावांचा तो ११ वेळा िनवडून येण्याचा विक्रकम बाळासाहेब नुसताच मोडणार नाहीत तर, सलग ११ वेळा िनवडून येण्याचा मानही महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात हेच िमळवतील हे आजच सांगून ठेवतो. 
१९८५ पासून आतापर्यंत आमदार राहताना राज्यमंत्री, मंत्री.. त्यातही आता महसूलमंत्री आिण विधानमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते अशा विविध पदांवर काम करताना बाळासाहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही झाले आिण ज्यावेळी महाराष्ट्रातील साेशलमिडीयावाले २०१९ च्या िनवडणुकीत काँग्रेस पक्षाला १० सुद्धा  जागा िमळणार नाहीत, असे सांगत होते तेव्हा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या बाळासाहेबांना ४४ जागा िनवडून आणल्या. गुजरातमध्ये िनरीक्षक म्हणूक काम करताना बाळासाहेबांनी ज्यांची िशफारस केली ते सगळे उमेदवार गुजरातमध्ये झालेल्या िनवडणुकीत िनवडून आले आहेत. राहुल गांधी यांचा बाळासाहेबांवर जो विश्वास बसला त्याचे मुख्य कारण त्यांच्या या संघटनात्मक खोल जाणीवांमध्ये आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या मंत्र्यांपैकी फक्त बाळासाहेब थोरात यांचेच नाव अाहे. िदल्लीच्या नेतृत्त्वाने बाळासाहेबांच्या या कुशल संघटन नेतृत्त्वाला मान्यता िदल्यासारखे आहे. 
महाराष्ट्रातील आजचे सरकार तीनचाकी आहे. त्यातील एक चाक काँग्रेसचे आहे आिण ते बाळासाहेबांच्या भरवशावर आहे. यापूर्वी मंत्री म्हणून काम करताना अनेकवेळा कठीण दुष्काळी परिस्थीतीत ते कृषी मंत्री होते तेव्हा... महाराष्ट्रातील असा एकही विभाग नाही िजथे बाळाहेबांनी कृषी मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप उमटवली नाही. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज च्ाव्हण, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात बाळासाहेबांचा प्रभाव जाणवणारा आहे. 
संगमनेरचे प्रतिनिधीत्त्व करताना बाळासाहेबांनी अाज संगमनेरचा चौफेर विकास केला. नािशकच्या जमिनीपेक्षा संगमनेरच्या जमिनीचा भाव जास्त आहे. जे जे नािशकमध्ये आहे ते ते संगमनेर मध्ये आहे. िकंबहुना नािशकच्या एक पाउल पुढे बाळाहेबांचे संगमनेरचे इंिजनीअरिंग कॉलेज देशात सातव्या क्रमांकावर आहे. बाळासाहेबांनी उभा केलेला राजहंस दुग्धप्रकल्प देशात नावाजला गेला. िशक्षण असो, सहकार असो, नगर िजल्ह्यात राजकारण करणे सोपे नाही. महाराष्ट्रात हा एकमेव असा िजल्हा अाहे, ज्या िजल्ह्याच्या नावात काना, मात्रा, वेलांटी काहीही नाही. अ ह म द न ग र.... पण या िजल्ह्याच्या राजकारणात ज्या वेलांटया आिण काना-मात्रे आहेत तेवढे जगात कुठेही नाहीत. कोल्हे- काळे-विखे-तनपुरे-रोहमारे- आिदक- खताळ- गडाख... या महादिग्गजांमध्ये भाऊसाहेब आिण बाळासाहेब नुसते टिकून राहीले नाहीत तर सगळ्यांच्या पुढे गेले. भाऊसाहेबही संगमनेरचे काँग्रेस आमदार होते. राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. करारी होते. बँकेचे अध्यक्ष म्हणून एकही चुकीची गोष्ट त्यांच्या हातून घडली नाही. वसंतदादांनी जेव्हा खाजगी क्षेत्रात वैद्यकीय आिण अिभयांत्रिकी महािवद्यालय द्यायचे ठरवले तेव्हा पहिला फोन भाऊसाहेबांना केला. आजचे संगमनेरचे जे इंिजनीअरिंग कॉलेज अाहे ती जागा दादांनी भाऊसाहेबांना बोलावून घेवून िदली. तेच काॅलेज आज देशात सातव्या क्रमांकावर आहे. यशवंतराव आिण दादांनी अनेकांना महाविद्यालये िदली. पण या दोघांच्याबद्दल कृतज्ञाता म्हणून यशवंतरावांच्ाा पुतळा संगमनेरच्या कॉलेजच्या प्रवेशद्वारावर उभा राहीला. आिण दादांचे भव्य तैलचित्र बाळासाहेबांनी उभे केले. अशी कृतज्ञाता जागवणारे िकती आहेत? बाळासाहेबच एक िदसतात... बाळासाहेबांनी ती परंपरा आणखी मोठी केली.  संगमनेरच्या चौफेर विकासात बाळासाहेबांना वजा करून आज पुढे जाता येणार नाही. सामाजिक जीवनात राजकारण न आणता, पक्ष न पाहता, सर्वांना मदत करणारा नेता म्हणून बाळासाहेबांचे नाव घेतले जाते. राजकारणात राहूनही अंगावर िचखल उडू द्यायचा नाही, हे सोपे नाही. पण बाळासाहेबांनी ते िसद्ध करून दाखवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या अत्यंत आदरणीय नेत्यांमध्ये बाळासाहेबांचे नाव मनापासून घेतले जाते. 
व्यक्तीश: मी बाळासाहेबांवर मनापासून आदर आिण प्रेम करणारा आहे. घटना तशी व्यक्तीगत आहे... पण बाळासाहेबांचे मोठेपण त्यातून िसद्ध होते... झाले असे की, माझे नात्यातील एक तरुण श्री. प्रशांत कुलकर्णी कोराेनाच्या दुसऱ्या  लाटेत जीवनाचा मोठा संघर्ष करत होते. वेंटिलेटरवर होते. हॉिस्पटलमधून फोन करून सांगण्यात आले की, TOCILIZUMAB  हे इंजेक्शन ताबडतोब िमळाले नाही तर पेशंटचे खरे नाही... मी प्रयत्न सुरू केला... सांगण्यात आले की, मेडीकल दुकानातून ही इंजेक्शने विकणे सरकारने बंद केले आहे. कारण त्याचा काळाबाजार होत आहे. इंजेक्शनची िकंमत ५० हजार आहे. ही इंजेक्शन देण्याचे अिधकार मुख्यमंत्र्यांनी िजल्हािधकारी पातळीवर िदले आहेत. मी ताबडतोब बाळासाहेबांना फोन केला... रात्री दहा वाजले होते. बाळासाहेबांनी फोन उचलला... विषय समजून घेतला... मला म्हणाले, ‘टेन्शन घेवू नका... एक तासात सगळी व्यवस्था करतो....’ एक तासानंतर ठाण्याचे त्यावेळचे  आर.डी.सी िशवाजीराव पाटील यांचा फोन आला... त्यांनी सांिगतले क, ‘आपल्या नातेवाईकाच्या इंजेक्शनची व्यवस्था झाली आहे... इंजेक्शन िदले गेले आहे...’ मी िशवाजीरावांचेही मन:पूर्वक आभार मानले. कोरोना काळात िजल्हािधकारी कार्यालये, सर्व कलेक्टरसह सर्व आर.डी.सी रात्री १२-१ वाजेपर्यंत कार्यालयात थांबत होते. सरकारी यंत्रणेवर आपण सहज टीका करतो. पण अशा कठीण काळात याच यंत्रणेने फार महत्त्वाची भूिमका बजावली आहे. मग कोरोना असो, महापूर असो, दुष्काळ असो नाहीतर मुंबईवरील हल्ला असो... 
प्रशांतचे प्राण वाचले.... सकाळ झाल्यावर तब्बेतीत फरक पडला.... बाळासाहेबांचे आभार कसे मानावेत.... त्यांना फोन केला... माझी कृतज्ञाता व्यक्त केली. त्यावेळी कळले की, ‘पेशंटला इंजेक्शन िदले जाईपर्यंत, रात्री उशीरापर्यंत बाळासाहेब कलेक्टर कार्यालयाकडून फॉलोअप घेत होते...’ त्यांच्या मनाचा मोठेपणाला कोणत्या तागडीत तोलणार? जेव्हा जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा तेव्हा त्या रात्रीचा तो क्षण समोर उभा राहतो आिण त्यांच्या बोलण्यात  ‘मी काही फार केले आहे’ असे  जराही ते जाणवू देत नाहीत. पण आमच्या परिवाराला आिण कुलकर्णी कुटुंबाला बाळासाहेब हे कायमचे देवमाणूसच वाटतात. नंतर माहिती िमळाली... कोरोना काळात बाळासाहेबांनी अशा कित्येक कुटुंबांना मदत करण्यात मनापासून पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*