*लोकनेते श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पूर्णाकृती प्रेरणाशिल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.....*
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पुणे येथे सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय सन्माननीय संसदरत्न खासदार *सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष लोकनेते श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पूर्णाकृती धातु प्रेरणा शिल्पाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला* .
गेली तीन तप म्हणजे 36 वर्षे लोकनेते श्री शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे बिनविरोध प्रभावी कार्यक्षम अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचे वस्ताद पै.ज्ञानेश्वर (माऊली) मांगडे आणि पैलवान मित्र परिवार व कुस्तीप्रेमींनी साहेबांचे पूर्णाकृती धातु शिल्प उभारण्याचा संकल्प केला.भविष्यातील असंख्य पिढ्यांना पवार साहेबांच्या कार्याचा वसा आणि वारसा ज्ञात व्हावा म्हणून हातात फाईल घेऊन सतत कार्यरत असणारे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरतपणे चालणारे साहेब....सदर पूर्णाकृती धातु शिल्पातून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिल्पकार सौ.सुप्रिया शेखर शिंदे यांनी अतोनात मेहनतीने या वीस महिन्यांच्या प्रवासात साकारले आहेत.सदर प्रेरणास्थळाच्या संकल्प रचनेत इंजिनिअर श्री.मनोज मांढरे यांनी साहेबांनी आजपर्यंत भूषविलेल्या विविध क्षेत्रातील पदांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.नमूद प्रेरणास्थळ "याची देही, याची डोळा" साहेबांचा सन्मान करत आहे,ही अखंड पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला गौरवास्पद बाब आहे.....असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत जगताप, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाड़े,
खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष : श्री.काकासाहेब चव्हाण, माजी महापौर नगरसेवक श्री. दत्ताभाऊ धनकवडे, नगरसेवक श्री. विशाल तांबे, नगरसेवक श्री.प्रकाशशेठ कदम, नगरसेवक पै.बाळाभाऊ धनकवडे, नगरसेवक श्री.युवराज बेलदरे, अर्जुन पुरस्कार विजेते पै.काकासाहेब पवार, पै.अशोक पवार,पै.विजय गावडे,पै.संतोष गरुड,पै.अमोल बराटे,पै.दिपक डोंगरे,वेल्हा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पै.प्रमोद लोहकरे, पै.बालाजी गव्हाणे,पै.भरत चौधरी,पै.आबा काळे,पै.विकी बनकर,पै.नरेंद्र मारणे,पै.उमेश दिघे,पै.अमोल शेडगे, पै.कृष्णात फिरींगे,पै.अमरदिप चांदगुडे,पै.तानाजी सागर,श्री.निशांत शिळीमकर,माजी नगरसेवक श्री.संतोष फरांदे, कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर, परिसरातील नागरिक प्रशिक्षणार्थी पैलवान आणि पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की "मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील उभारण्यात येणारा आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचा पूर्णाकृती प्रेरणाशिल्प हे पैलवानांच्या सोबतच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, या प्रेरणा शिल्पच्या ठिकाणी कुस्ती विषयक माहिती उपलब्ध होणार आहे." महाराष्ट्र राज्यातील कुस्तीगीरासाठी तारणहार असलेल्या पवार साहेबांच्या प्रेरणाशिल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल वस्ताद पै.ज्ञानेश्वर(माऊली)मांगडे यांचे कौतुक केले.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य पै.कुलदीप(तात्या)कोंडे, यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार पै.माऊली मांगडे यांनी मानले*.
Comments
Post a Comment