मंत्री नव्हे, देवमाणूस- बाळासाहेब थोरात
मंत्री नव्हे, देवमाणूस ७ फेब्रुवारी रोजी बाळासाहेब थोरात ६९ वर्षे पूर्ण करून ७० व्या वर्षात पाउल ठेवित आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, सहकारात ज्या िनष्ठावंत आिण प्रामािणक नेत्यांची इितहासाला दखल घ्यावी लागेल त्यामध्ये बाळासाहेब थोरात हे नाव अत्यंत सन्मानाने िलहावे लागेल. आजच्या राजकारणात िनसरडेपणा आहे. आजचे राजकारण पैशांभोवती िफरत आहे. आजचे राजकारण िसद्धी ऐवजी प्रसिद्धीसाठी आहे. जाहिरातबाजीसाठी आहे. या सगळ्या अस्वच्छ राजकारणात गेली ३५-४० वर्षे आपल्या पांढऱ्या स्वच्छ पोशाखावर एक डागसुद्धा पडू न िदलेला महाराष्ट्रातील राजकारणी शोधायचा तर बाळासाहेब थोरात या नावाशी येवून थांबावे लागेल. आपला पक्ष, आपली राजकीय भूिमका, सहकारातील आपले काम, सामािजक काम सतत करत रहायचे. यश आपोआप पाठी येईल. या करिता आटापीटा करावा लागणार नाही. लोक लाख डोळ्यांनी पाहतात आिण व्यक्तीचे मूल्यमापन करतात. अशी श्रद्धा ठेवून संयमित भूिमकेने राजकारणात वावरणारे आज दुर्मिळ झालेले आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर बाळासाहेब आहेत. जाहिरातबाजी न करता, पत्रकार परिषदा न घेता, आदळ-आपट न करता, कुणाही वि...