कर्तृत्व संपन्न नगरसेविका अँड नेहा सुर्यवंशी
कर्तृत्व संपन्न नगरसेविका अँड नेहा सुर्यवंशी आपल्या स्वतहाच्या प्रगतीबरोबर समाजातील इतर घटकांना न्याय मिळवुण देण्यासाठी व प्रगतीच्या प्रवाहात सामील करण्यासाठी अथक परीश्रम व प्रयत्न करत आहेत त्या कर्तृत्व संपन्न शिराळ्याच्या नगरसेविका अँड नेहा सुर्यवंशी मँडम त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त थोडक्यात घेतलेला कामाचा आढावा ऐतिहासिक पाश्वभुमि असलेल्या शिराळा नगरीच्या न्यायालयातील पहिली महिला वकील होण्याचा मान नेहा सुर्यवंशी यांना मिळाला या संधीच सोन करत शिराळा तालुक्यातील डोंगरी विभागातील महिलांना तसेच नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. महिलांना प्रगतीच्या प्रवाहात सामील करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले आहेत महिलांच्या
साठीअनेक योजनांची महिती तळागाळातील महिला वर्गाना देऊन त्यांच्यासाठी काम करीत आहेत आजवर गेली वीस वर्षे महिलांच्या अनेक समस्या जाणून विविध माध्यमातून महिलांना मदत केली आहे वेळप्रसंगी कोर्टात लढा दिला आहे, आणि न्याय मिळवून देखील दिला आहे. सामाजिक कार्याच्या फलस्वरूप आज शिराळा नगरपंचायतच्या नगरसेविका आहेत शिराळ्याच्या विकासासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात नगरसेविका म्हणून चार वर्षात जबाबदारपणे उल्लेखनीय काम केले आहे समाजातील केलेल्या सार्वजनिक वैयक्तिक मदतीचा फोटो काढुन प्रसिद्दी करण्यापेक्षा मदत सहकार्य अनेकांना करण्यासाठी आघाडीवर असतात सांगली जिल्हा डोंगरी विभाग समितीच्या सदस्या असलेल्या सुर्यवंशी मँडमनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत या सर्व कामात त्यांना पती अँड नरेंद्र सुर्यवंशी यांची महत्वपुर्ण सहकार्य आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम केल्यामुळेच महिंलांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या नेहा सुर्यवंशी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक राज्य स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांना वाढदिवसाच्या व भावी वाटचालीस मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🙏🎂🌹
* विजय गराडे मांगले पुण्यनगरी पत्रकार
Comments
Post a Comment