स्व वस्ताद जगन्नाथ जाधव (नाना) यांच्या सहाव्या पुण्य स्मरणार्थ, चिंचोली ता शिराळा येथे* *भव्य निकाली कुत्यांचे जंगी मैदान*
*स्व वस्ताद जगन्नाथ जाधव (नाना) यांच्या सहाव्या पुण्य स्मरणार्थ, चिंचोली ता शिराळा येथे*
*भव्य निकाली कुत्यांचे जंगी मैदान*
•••••••••••••••••••••••••••
रविवार दि ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता
...............................
पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा | या अभंगाप्रमाणे *चिंचोली गावचे सुपुत्र पै. निवेदक सुरेश जाधव व त्यांचे बंधू दिनेश जाधव* यांनी आपल्या वडिलांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कुस्ती मैदानाचे आपल्या चिंचोली या गावातआयोजन केले आहे.
*कै. पै. जगन्नाथ जाधव (नाना ) वस्ताद हे कुस्ती निवेदक पै सुरेश जाधव व दिनेश जाधव यांचे वडील*..... जगन्नाथ वस्ताद यांना कुस्तीची पहिल्यापासूनच आवड. घरची परिस्थिती गरिबीची होती एक वेळचे सुद्धा जेवण मिळत नसल्याने त्यांना पैलवानकी पासून माघार घ्यावी लागली. परंतु दररोज तालमीत जाणे मुलांना कुस्तीतील डाव शिकवणे त्यांच्यासोबत व्यायाम करणे त्यांना चांगल्या चार गोष्टी सांगणे हा त्यांचा दिनक्रम शेवटपर्यंत चालला. जाधव वस्ताद यांनी आपल्या दोन्ही मुलांना तालमीचा नाद लावला. *त्याच बरोबर गावातील अनेक मुलांनाही तालमीचे धडे दिले. आज गरिबीमुळे नानांना स्वतःला पैलवान होता आलं नाही*. किंबहुना आपल्या दोन्ही मुलांपैकी कोणालाही पैलवान करता आलं नाही. गरीबी जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेली होती.
कै. जगन्नाथ वस्ताद यांना भजनाचा व वारकरी संप्रदायाचा भारी नाद होता. त्यामुळे ते नेहमी देवाचे नामस्मरणातच गुंग असायचे. रोज दुसऱ्याच्या शेतात रोजगार करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. आयुष्यभर राब- राब राबले कोणताही आजार नसताना काम करत- करतच ते स्वर्गवासी झाले.
आज त्यांची दोन्ही मुलं सुरेश आणि दिनेश हे कुटुंबाचा आणि वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. सुरेश कुस्ती निवेदनातून आणि दिनेश मुंबईला खाजगी क्षेत्रात काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. आपल्या घासातील एक घास काढून त्यांनी माणुसकी जतन केली. *आणि याच जतन केलेल्या माणुसकीच्या फंडातून आपल्या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे*.
खरं पाहता कुस्ती मैदान घेणे ही साधी गोष्ट नसून त्याच्यासाठी पैसा असावा लागतो. परंतु जगन्नाथ वस्ताद यांच्या दोन्ही मुलांनी पैसा नसून माणुसकी कमवलेली आहे. आणि या माणुसकीतून आज या कुस्ती मैदानाचे नियोजन केले आहे. खरोखरच आज जगन्नाथ (नाना) असते तर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली असती . आणि सांगितलं असतं बाळांनो धन दौलत ही कामाला येत नसते तर आपण जोडलेली माणसे आपल्या कामाला येत असतात.
आमचे सर्वांचे पितृतुल्य वस्ताद जगन्नाथ नाना यांना *भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना*.
.....................................
🎤कुस्ती निवेदक
*पै सुरेश जाधव सर* चिंचोली
⏩हलगीवादव - मारुती मोरे आणि सहकारी (गारगोटी)
⭕मैदान संयोजन ⭕
हनुमान कुस्ती आखाडा, पै सुरेश जाधव पै दिनेश जाधव मित्र परिवार,ग्रामस्थ चिंचोली, ता शिराळा जि सांगली
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य
Comments
Post a Comment