आदर्श डॉक्टर मनोहर मोरे

*आदर्श डॉक्टर मनोहर मोरे*
     रोप्यमहोत्सवी वर्षाकडे आदर्शवत वाटचाल करणाऱ्या सर्व सोयीनियुक्त अशा दिशा लँब च्या माध्यमातून मांगले गावात आरोग्य विषयी तपासणी करणारे डॉक्टर मनोहर मोरे होय .
      1998 साली मांगले गावात पहिली लँब डॉक्टर मनोहर मोरे यांनी सुरू केली. त्यामुळे गावासह परीसरातील रुग्णांना विविध तपासणी साठी शिराळा वारणानगर येथे जावे लागले नाही. तपासणी जलद व रिपोर्ट देखील वेळेत मिळु लागले. त्यामुळे निदान झाले मुळे उपचार परफेक्ट होत होते. मांगले गावात दिशा लँबच्या माध्यमातून डॉ मोरे यांनी अविरतपणे रुग्णांना चांगली सेवा दिली आहे . कोरोना सारख्या गंभीर परस्थितीत शासणाणे जिल्हा बंदीची अंमलबजावणी कडक केली. यावेळी कारण सांगुन ते सावर्डे येथे थांबले नाहीत तर मांगले गावात लँब सुरुच ठेवली यावेळी डॉक्टरांना सावर्डे धरणापासुन महिनाभर चालत यावे लागले.  तर देशाच्या सिमेएवढी तपासणी व फौजफाटा चिकुर्डे पुलावर होता जिल्हाबंदी च्या काळात ये जा करण्यासाठी पास काढून देखील प्रवास करणे जिकिरीचे होते तरीदेखील डॉक्टर मनोहर मोरे यांनी कोरोना काळात अनंत अडचणीवर मात करून मांगले गावाला आरोग्य सुविधा दिली त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला.
 शांत ,संयमी, हुशार असणाऱ्या डॉक्टर मनोहर मोरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व आरोग्य सेवेला धन्यवाद 🎂🎂🌹💐💐🙏 
  *विजय गराडे पत्रकार पुण्यनगरी मांगले*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*