अनेक बहिणी आपल्या भावांना ज्ञानाचे भांडार म्हणून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट दिला
चिखली:- मनोजकुमार मस्के
आजची भाऊबीज ही कपडे, मिठाई यांच्या व्यतिरिक्त अनेक बहिणींनी आपल्या भावाला पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट देऊन साजरी केली. हा दिवाळी अंक भेट देण्याच्या मागचा उद्देश कपडे मिठाई, कधी ना कधीतरी संपणार आहे. परंतु या अंकातले लेख असतील, विचार असतील हे आयुष्यभर सोबत राहणार आहेत म्हणून अनेक बहिणींनी कपडे आणि मिठाई बाजूला सारून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट देणे अधिक पसंत केले. यावर्षी कोरोणाचे सावट असल्याने. दिवाळीसारखा सण आला कधी गेला कधी कळलच नाही. तसा यावर्षी उत्साह फार कमीच पाहायला मिळाला. बघता बघता दिवाळी संपली आणि भाऊबीज आली.
कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याची आयुष्य मागते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.
भाऊबीज चे औचित्य साधून बहिणीने भेट म्हणून दिलेला पुण्यनगरीचा दिवाळी अंक खरोखरच भावांना प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की.
फोटो:- अनेक बहिणी आपल्या भावांना ज्ञानाचे भांडार म्हणून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट दिला
Comments
Post a Comment