जगाचा पोसिंदा अडचणीत आहे.किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.
जगाचा पोसिंदा अडचणीत आहे. किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा. मनोजकुमार मस्के बघता बघता वर्ष संपत आले. जन्मभर विसरता येणार नाही असं हे वर्ष होते. २०२० या वर्षांत जनता घाबरली. संपूर्ण जग शांत होते. शेतकर्यांनी धान्याची, पैसेवाल्यांनी पैश्याची मिळेल ती मदत केली. पैपाहुणे ऐकमेकाकडे येणे बंद झाले. सरकारने रेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला धान्य पुरविले अनेकांच्या पोटाचा प्रश्न संपला असला तरी या संपूर्ण महामारीत पुरता मेला तो शेतकरी, कारण पेरणीपूर्वी महामारीचे सावट, पेरणीनंतर लाॅकडाउनमुळे अंतर मशागत करण्यास मजुरांची टंचाई, पिक काढणिच्या वेळी पावसाने झोडपले, आणि त्यातुन काही उरलेसुरलेले धान्य शेतातुन काढण्यासाठी रोजगारी मिळत नसल्याने शेतकरी पुरता बेजार झाला असल्याचे चित्र ग्रामीणभागात दिसत आहे. रोजंदारी करणाऱ्यांची संख्या खुपचं कमी झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकत्र येऊन पैरा पद्धत करूनच पिकांची पेरणी आणी काढणी करावी लागत आहे. तंत्रज्ञानाचा वापर झाला खरा पण या तंत्रज्ञानाने माणूस...