*मा प्रताप (भाऊ) कदम वाढदिवस विशेष* ..... ................................ जिवंत नागाची पुजा करणारे गाव म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ओळख असणारे गाव नागपंचमीचे ३२, शिराळा, पैलवानांची खान म्हणून प्रसिद्ध असणारा हा तालुका आहे. आणि याच तालुक्यातील तांबड्या मातीची अविरतपणे सेवा करणारे सर्वांचे लाडके कुस्ती प्रेमी आणि कुस्तीसाठी सदैव सेवा देण्यास बांधील असणारे *आमचे मित्र व कुस्ती प्रसारक प्रतापसिंह कदम (भाऊ)*. एकदम सच्चा दिलाचा दिलदार, तोंडावर रोखठोक बोलणं पटलं तर ठिक, नाही पटलं तर त्याहुन ठीक माननारा प्रताप कदम . आमची ओळख तशी कुस्तीच्या मैदानावरच झाली. अनेक मैदानामध्ये आयोजकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करणारा हा अवलिया कोण मला जाणून घेण्याची उत्सुकता लागली. मी न राहुन प्रतापराव कदम यांना विचारले तुम्ही प्रत्येक गावच्या मैदानात प्रमाणपत्र देता याच्या मागचा उद्देश काय? तेंव्हा प्रतापभाऊंनी जे उत्तर दिले ते म्हणजे *आज जी कुस्ती लयास चालली आहे ती कुठतरी टीकावी ,वाढावी म्हणून मी पदरमोड करून हे कार्य चालु केले आहे*. खुपचं बरं वाटलं हे वा...