प्रतीक्रिया वाचल्या की आश्रुंना आवरणे कठीण होते. जर मामा सारखी माणसं प्रत्येक रूग्णालयास मिळाली तर खरंच असं कोरोनासारखं संकट आम्ही हसत- हसत स्विकारण्यास तयार आहे. असे अनेकजन सांगत होते.

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना ग्रस्तांची सेवा करणारा संदिप मामा

मनोजकुमार मस्के - चिखली

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांचा देवमाणूस  म्हणुन ओळखले जाणारे  संदिप मामा 
       गेले काही दिवस झाले शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात संदिप मामा यांच्या रूपाने परमेश्वर असल्याचे अनेक कोरोनाग्रस्त पेशंट सांगत आहेत. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोविडसेंटर चालु असल्याने एकुण ३५ च्या आसपास येथे कोरोनाबाधीत रुग्ण आहेत.  या सर्व पेशंटची विचारपुस व उठाठेव हे एकटे संदिप मामा करत असतात. लादी पुसणे, पेशंटना जेवन देणे, गोळ्या देणे, पेशंटना काही हवं असल्यास ते लगेच उपलब्ध करून देतात. शंभरवेळा खालीवर करत पेशंटना सेवा पुरविण्यातच मामा आनंद मानतात.
           संदिप मामा हे कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहेत.  ते कोल्हापुर येथील सिपीआर या रुग्णालयात वाॅर्डबाॅय म्हणुन काम करत होते. गेली दोन महिने झाले ते शिराळा उपजिल्हा रुग्णालयात वाॅर्डबाॅय म्हणुन आले आहेत. कोरोना बाधीतांचा संपुर्ण वाॅर्डची जबाबदारी संदिप मामा यांच्यावरच आहे. संपुर्ण वार्ड त्यांना देवमाणूस म्हणुनच ओळखतो. वार्डातील लोकांचे मनोबल वाढविणे , कोरोनाग्रस्त पेशंटच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना सुरक्षीत असल्याची जाणीव देणे. अगदी घरातील माणसाप्रमाणे त्यांचा सहवास लोकांनां भावतो. रुग्णालयाची पायरी न चढणारे पेशंट बरे होऊन घरी परततांना संदिप मामा यांच्या गळ्यात पडून रडतात तेव्हा पाहणाराच्या सुद्धा डोळ्यात पाणी उभा राहते. अशी काय जादु या १०-१२  दिवसांत या माणसाने या रूग्णांच्या मनावर केली, कोणास ठाऊक. रुग्णालयातुन घरी परतणारा प्रत्येक पेशंट हा संदिप मामाला कधीही विसरणार नाही.असंच जणू सांगत होता. मांगरुळच्या बाबा शेणवी यांनी या मामांची माहिती फोनवर दिली. मामांचे प्रेम सांगत असताना बाबा शेणवीचा उर भरुन येत होता. प्रत्येकाची सेवा करणाऱ्या मामांची आर्धींगीणी मात्र आधीच मामाचा साथ सोडून कायमची देवाघरी गेली होती. प्रत्येकाला धीर देणाऱ्या मामाला धीर कोण देत असेल हा प्रश्न मनातुन जाता जात नाही. 
         याच दरम्यान या शिराळा उपजिल्हा रुग्णालयात बिळाशी गावचे गौरव जोशी यांचा वाढदिवस सर्व पेशंटना एकत्र घेऊ करण्यात आला. तेंव्हा गौरव खुप रडला कोरोना पेशंट म्हणुन आमच्या जवळ आमचे घरचे सुद्धा आले नाहीत पण या संदिप मामाने पोटाशी धरुन माझा वाढदिवस केला. आणि आम्हाला अगदी आईप्रमाणे माया लावली. हा माणुस नसुन देवमाणुसच म्हणावा लागेल. असे कोरोनामुक्त पेशंटनी सांगीतले प्रत्येक पेशंटने स्वत:च्या हस्ताक्षरात लीहलेल्या प्रतीक्रिया वाचल्या की आश्रुंना आवरणे कठीण होते. जर मामा सारखी माणसं प्रत्येक रूग्णालयास मिळाली तर खरंच असं कोरोनासारखं संकट आम्ही हसत- हसत स्विकारण्यास तयार आहे. असे अनेकजन सांगत होते.

चैकट :- जाजा  पत्रा मार भरारी घे एक दिवस विश्रांती जाऊन सांग माझ्या प्रिय संदीप मामाच्या कानी सुखरूप आहे तुझा भाचा गौरव जोशी.... उदंड आयुष्य लाभो माझ्या संदीप मामा ला...  माझ्या समर्थांची व सद्गुरू ची कृपा दृष्टी सदैव माझे  दैवत संदीप मामा पाशी... उगाची भितोसी भय हे पळु दे कोरोना सेंटर ३२ शिराळा उप रुग्णालय... मध्ये संदीप मामा वॉर्डबॉय आहे देवरूपी हे सर्वांना कळू दे
-गौरव दत्तात्रय जोशी (बिळाशी)

         
      

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*