अखेर तो कोरोनावर मात करून सुखरूप आला आपल्या घरी ....

अखेर तो कोरोनावर मात करून सुखरूप आला आपल्या घरी . गेले तेरा-चौदा दिवस एक खडतर प्रवास करत तो कोरोनाला हरवुन आज आपल्या कुटूंबात सुखरुप आल्याने आई व बायकोला आनंदाश्रु आवरेनाशे झाले.
       मांगरूळ गावचा पोपट मस्के हा आरोग्य खात्यात नोकरी करत असल्याने त्यांचा संपर्क अनेक कोरोना बाधीतांशि आला होता. संपुर्ण सुरक्षा पाळुन सुद्धा त्याला कोरोनाने पकडले. पण पोपट फार धाडसी असल्याने  लक्षणे जाणवताच तो तपासनीस स्वत:हुन समोर आला. तपासणीत तो कोरोनाग्रस्त आहे हे समजताच उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल झाला. चौदा-पंधरा दिवस उपचार घेऊन अखेर तो आपल्या कुटुंबात सुखरूप आल्याने गावातील लोकांनी त्यांचे स्वागत केले. 
       आज पोपट घरी आला हा आनंद त्याची आई पत्नी व मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आपले अश्रु लपवत त्यांची आई व पत्नी यांना काय करु आणि काय नको अशि त्यांची अवस्था झाली होती. गावातील ही पहीलीच व्यक्ती कोरोनाला हरवुन आल्याने सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता. 
     आपण कोरोनावर मात करू शकतो हे त्याने उदाहरणासहीत पटवून दिल्याने अनेकांची कोरोनाची भिती कमी होऊ शकते हे मात्र नक्की आहे.  


मनोज मस्के - मांगरूळ

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*