राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?
राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का? आज राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा खऱ्याअर्थाने महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणावा लागेल. अनेक खडतर प्रवास करत पै. राहुल आवारे लढला. एवढंच काय आपल्या शांत स्वभावाने त्यांनी संपुर्ण भारताचे लक्ष वेधले. अशा या प्रामाणिक, शांत आणि संयमी पैलवानाला केंद्र शासनाचा अर्जुनविर पुरस्काराने सन्मान होत असताना महाराष्ट्राच्या मातीला न्याय मिळाला हे मात्र खरे. एकीकडे पै.राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित केले. त्याचा आनंद संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे. दुसरीकडे कुस्तीतील जादुगार १९८२ ला काॅमनवेल्थ गेममधुन गोल्डमिडल घेतलेल्या राम सारंग यांचेवर अन्याय होताना दिसत आहे. आज प्रामुख्याने मान्यता प्राप्त चार गेम आहेत त्यामध्ये एशियन गेम्स, काॅमनवेल्थ गेम,. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आॅलंपिक या चार गेममध्ये महाराष्ट्राचे मिडल असणारे स्वर्गिय पै. गणपतराव आंदळकर, पै. मारूती माने, पै.हरिषचंद्र बिराजदार, पै. राम सारंग सर आणि पै. राहुल...