तुटलेल्या झाडाला फुटलेली पालवी जगणं शिकवते

जगण्याची जीद्द प्रभळ असेल तर मनुष्य कसल्याही संकटातुन आपले जीवन जगत असतो. आज कोरोनाच्या भितीने संपुर्ण मनुष्य प्राणी भयभीत आहे. खरं पाहता कोरोनाने कमी आणि भितीनेच जास्त लोकं मरत असल्याचे लोकांच्यात बोलले जात आहे.  
        आजपर्यंत माणसं पैशासाठी झटत होती. कोणाकडे जाण्यास सुद्धा वेळ मिळत नव्हता. प्रत्येकजन आपापल्या कामात गुंतलेला असताना  संपुर्ण मानव समाज फक्तन- फक्त जगण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना सारख्या महामारिच्या  संकटाची भीती पशुपक्षी , प्राण्यांच्यात कुठेही पाहायला मिळत नाही. सगळे कसे निसर्गाचा आनंद घेत जगत आहेत. 
      खरं पाहता माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो ही व्याख्याच जणू या निसर्गाने खोडून टाकली. कारण माणसांपेक्षा जास्त आण्णाची गरज ही हत्तीला असते. मात्र हत्तीला आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी पैशाची आवश्यकता भासत नाही. पैशाची गरज आहे ती फक्त माणवाला त्यामुळे जे महामारिसारखे संकट उभे ठाकले याला जबाबदार फक्त माणवजातीच असू शकते. पशुपक्षी किंवा निसर्ग याला दोषी नाही.
      आज अनेक जीव या धर्तीवर सुखात नांदात आहेत . फक्त मानव सोडूनी सगळे प्राणी-पशुपक्षी, झाडे निसर्गाच्या सानिध्यात आनंदात जगताहेत. माणुस मात्र नैसर्गीक आॅक्शिजनाच्या शोधात आहे. जो अधिकार त्याने कधीच गमावला आहे. आज जगण्यासाठी वेंटीलेटरची गरज मात्र मणुष्य जीव सोडून कोणत्याही जीवाला लागत नाही. अनेक झाडांचे जीव घेऊन सिमेंटचे जंगल निर्माण करणाऱ्या मणुष्याला हे कधी समजणार. जर निसर्ग नाही वाचवला तर या निसर्गातुन मनुष्य कसपाटासमान बाजुला होईल. अणि पुन्हा मानवाव्यतीरिक्त निसर्ग आपली निर्मिती आपणच करेल हे मात्र खरे आहे.  संपुर्ण तुटुन सद्धा जगण्यासाठी पुन्हा जिद्दीने ऊभा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तुटलेल्या झाडाला फुटलेल्या पालवितुन जाणवते.  हा निसर्गाने माणवाला दिलेला संकेत आहे. 
    

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*