Posts

Showing posts from October, 2025

ती… माझं घरपण…

Image
ती… माझं घरपण… आयुष्य जगताना आपल्याला कोणी घडवतं, आपल्याला प्रेम देतं, आपल्यासाठी स्वतःला झिजवतं ते आपले आई-वडील— हे सगळं समजायला वेळ लागतो. पण एकदा हे लक्षात आलं की, त्या व्यक्तीकडे पाहताना डोळे नकळत भरून येतात…आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर ती व्यक्ती म्हणजे आपली धर्म पत्नी , बायको  २० एप्रिल २००६ रोजी ती माझ्या आयुष्यात आली. १९ वर्षांचा हा एकत्रचा प्रवास – सहज नव्हता. सुख होते, दु:ख होतं, परीक्षा होत्या… पण एका गोष्टीवर मात्र कधीच तक्रार नाही आली — तिच्या समर्पणावर, तिच्या निष्ठेवर माझ्या वडिलांच्या निधनानंतर, तीने संपूर्ण घराला आपलं घर मानलं. तिने माझ्या आईला "आई" म्हटलं ते मुखाने नव्हे तर मनाने. माझ्या भावांना आपले भाऊ मानलं, वहिनींना बहीण.  — कोणतेही नाटक नाही, कोणताही बनाव नाही… फक्त प्रामाणिक प्रेम आणि मनापासूनची आपुलकी. तीने कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही. कधी हट्ट नाही, कधी तक्रार नाही. *तिचं हसू हेच तिचं हत्यार* – *आणि तेच आमचं बळ*. कितीही कामाचा ताण असो, चेहरा कायम हसरा. घरात सर्वांशी ज्या पद्धतीने ती वागत आली आहे, ते पाहून मला जाणवलं –*माझं घर ...

*मोरेवाडी गावात उपसरपंचपदी संजय आकाराम कटके यांची बिनविरोध निवड*

Image
*मोरेवाडी गावात उपसरपंचपदी संजय आकाराम कटके यांची बिनविरोध निवड* *लोकशाही प्रक्रियेला चालना देणारी ऐतिहासिक निवड* मांगरूळ वार्ताहर  शिराळा तालुका येथील मोरेवाडी गावामध्ये नुकतीच उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले संजय आकाराम काटके यांची एकमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड गावाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानली जात असून अनेक वर्षांनी ग्रामसभेच्या लोकशाही प्रक्रियेतून अशा पद्धतीची निवड पार पडली आहे. गावच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याच्या उद्देशाने आणि गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या सहमतीनुसार, उपसरपंच पदाचा कार्यकाळ अडीच अडीच वर्षांचा ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने, पहिल्या अडीच वर्षांसाठी संदीप दगडू सावंत यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिले. आता उर्वरित कार्यकाळासाठी संजय काटके यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेसाठी गावाच्या सरपंच लक्ष्मी लक्ष्मण डिगे, माजी सरपंच आशोक डिगे उपसरपंच संदीप दगडू सावंत, इतर सर्व सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, तसेच गावा...