Posts

Showing posts from September, 2025

"*श्रद्धेचं नातं – प्रशांत सर, अक्षय भाऊ आणि चिंचेश्वर मंदिर*"

Image
"*श्रद्धेचं नातं – प्रशांत सर, अक्षय भाऊ आणि चिंचेश्वर मंदिर*" नवरात्रीच्या मंगलमय उत्सवात, चिंचेश्वर मंदिरात एका खास भेटीने वेगळंच तेज आलं… अक्षय आत्माराम पाटील भाऊ (मांगरूळ) – कै. आत्माराम दादांचे चिरंजीव – आपल्या गावाच्या आणि मंदिराच्या सेवेत नेहमीच तत्पर असनारे. या वर्षी त्यांच्या सोबत आले होते ठाणा महानगरपालिकेत अधिकारी पदावर कार्यरत असलेले प्रशांत अंकुश गुरव –गाव  रत्नागिरी येथील, पण मनाने पूर्णपणे चिंचेश्वर देवाच्या भक्तीत एकरूप झालेले. प्रशांत सर आणि चिंचेश्वर देव यांचं नातं काही आजचं नाही. कै. आत्माराम दादा असताना, प्रशांत सरांनी मंदिर परिसरात खोली बांधण्यासाठी *50 हजार रुपयांची* मोलाची देणगी दिली होती. तेव्हापासून देव आणि भक्त यांच्यातला एक अदृश्य पण अतूट धागा तयार झाला. या वर्षी त्यांनी नवरात्रीच्या फराळ वाटप उपक्रमासाठी तब्बल १०,००० रुपयांची देणगी दिली. त्यांचं हे योगदान केवळ आर्थिक नव्हतं, तर त्यामागे असलेली श्रद्धा, प्रेम आणि सहभागाची जाणीवही तितकीच मोठी होती. त्यांनी या उपक्रमाचं केवळ कौतुकच केलं नाही, तर स्वतः मंदिरात हजर राहून अक्षय दादांसोबत मायम...

दोस्तीच्या दुनियेतला दिलदार मित्र – पै विजय मस्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Image
दोस्तीच्या दुनियेतला दिलदार मित्र – पै विजय मस्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ••••••••••••••••••••••••••••••••• मांगरूळ गावाचे सुपुत्र, कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले पैलवान, मनाने अत्यंत दिलदार आणि मैत्रीतला आधारस्तंभ — पै विजय मस्के यांचा आज वाढदिवस! *काही माणसं आपल्या बुद्धिमत्ता, कार्यकौशल्य, आणि निष्ठेच्या जोरावर आयुष्य गढून घेतात. काहीजण स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून आपली वाट शोधतात. आणि फार थोडे लोक असतात जे स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगतात. *पै विजय मस्के हे असंच एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व!* विजय मस्के यांची मैत्री म्हणजे नात्यांची एक वेगळीच शिदोरी. मित्राला अडचण आली की कुठलाही विचार न करता, हातातील काम बाजूला ठेवून मदतीला धावून जाणारा, कोणताही राग न धरता सर्वांसोबत हसत-खेळत नातं जपणारा विजय — हा खरं तर प्रत्येक मित्रमंडळींसाठी एक भाग्य आहे. कुस्ती हा त्याचा आत्मा आहे. लहानपणापासूनच तालमीचं वेड, मेहनतीने अंगी बाणवलेली ताकद, आणि *महात्मा फुले व्यायामशाळेत घेतलेले प्रशिक्षण* — यामुळे तो एक *नावलौकिक प्राप्त केलेला पैलवान* म्हणून पुढे आला. आजही त्याचं ...