शिराळा उत्तर भागातील बुलंद आवाज...अजाद शत्रू , कृष्णा लाला नलवडे (भाऊ)
शिराळा उत्तर भागातील बुलंद आवाज...अजाद शत्रू , कृष्णा लाला नलवडे (भाऊ) मनोजकुमार मस्के, मांगरूळ नागपंचमीचे ३२, शिराळा, प्रसिद्ध असणारा हा तालुका आहे. आणि याच तालुक्यातील प्रसिद्ध असणारे देवस्थान गिरजवडे ज्योतिबा, या जोतिबाच्या पायथ्याशी असणारे एक सामान्य गाव म्हणजे गिरजवडे याच गावातील सामाजिक कामासाठी अविरतपणे वाहून घेतलेले व आमदार सत्यजित देशमुख यांचे विश्वासू कार्यकर्ते सर्वांचे लाडके सर्वसामान्यांना सदैव सेवा देण्यास बांधील असणारे सर्वांचे मित्र व समाजसेवक कृष्णा नलवडे (भाऊ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! एकदम सच्चा दिलाचा दिलदार, तोंडावर रोखठोक बोलणं पटलं तर ठिक, नाही पटलं तर त्याहुन ठीक माननारा कृष्णा भाऊ . यांची ओळख तशी शिराळा उत्तर भागासह संपूर्ण शिराळा तालुक्यात आहे. एक जून रोजी कृष्णा भाऊंचा वाढदिवस ज्योतिबाच्या पावन स्पर्शाने व रेणुका मातेच्या आशीर्वादाने एका सामान्य कुटुंबात कृष्णा भाऊंचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची त्यातच वडार समाज असल्याने हातावरचे पोट अशा परिस्थितीत कृष्णा भाऊंचा जन्म 1जून 1990 साली गिरजवडे गावी झाला. 2007 ला ते बारावी पास झा...