*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)*
*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)* मनोजकुमार मस्के, मांगरूळ "*आठवणी कधीच मरत नाहीत, त्या मनात घर करून राहतात... आणि माणूस जातो तेव्हा फक्त शरीर जातं, आठवणींमध्ये तो कायमच जिवंत राहतो*." आज संजू दादा आपल्याला सोडून जाऊन एक संपूर्ण वर्ष लोटलंय… पण खरं सांगायचं तर, तुमची आठवण, तुमचं हास्य, तुमचं मार्गदर्शन, तुमचं माणुसपण — हे सगळं अजूनही ताजंच वाटतं… अगदी कालच घडलंय असं. नेहमी हसतमुख असणारा, प्रत्येकाशी आपुलकीनं वागणारा, कोणत्याही अडचणीत मार्गदर्शन करणारा, "भविष्यासाठी काहीतरी करून ठेवावं..." असा सल्ला देणारा — हा आपला संजू दादा अचानक गेल्याचं ऐकून काळीज थरथरलं. एलआयसीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या भविष्याची आखणी करणारा, अनेक घरांना आर्थिक साक्षरतेची दिशा दाखवणारा माणूस... स्वतः मात्र इतक्या अचानकपणे कोणालाही काही न सांगता निघून जाईल असं वाटलंच नव्हतं. दादा, तुमच्या जाण्यानं एक मोठा आधारच निखळला. पत्नी, लहान मुलं, कुटुंबीय — सगळे अजूनही त्या धक्क्यातून सावरले नाहीत. मित्रमंडळी, स्नेही, शेजारी — आजही तुझी वाट पाहतायत. तुझं ते हसणं, मनमोकळं ...