Posts

Showing posts from February, 2024

प्रिय मनोज दादा ,

Image
प्रिय मनोज दादा ,  आम्हाला आनंद देणाऱ्या बालपणातील आमच्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी  ज्याच्याशी जुडलेल्या आहेत अशा आमच्या प्रेमळ, हुशार, समजूतदार आमच्या आयुष्यातील चढ-उतारामध्ये आम्हाला खंबीरपणे पाठिंबा देऊन मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावणाऱ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास ज्याच्या सहवासामुळे आम्हाला सहज पार करता आला, लहानपणीची आपली भांडणं, मोठेपणी तु आम्हाला दिलेला आधार आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन हा आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे, भावापेक्षा जास्त जो आमचा मित्र आहे, त्याच्याशी आम्ही आमच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो जो आम्हाला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो, ज्याच्याशी बोलल्यानंतर आम्हाला आमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते आणि समस्या सोडवण्यासाठी जो आमची मदतही करतो, आमच्यासाठी आमचे आई-वडिलांची अशी दुहेरी भूमिका हे ठामपणे निभावणाऱ्या, आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर आम्हाला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे असा तू.             आज तुझा जन्मदिवस म्हणजे आजच्या दिवश...

तुतारी, मशाल, हात... ‘वंचित’ची घ्या साथ... मग सगळं जमतंय बघा...

Image
तुतारी, मशाल, हात... ‘वंचित’ची घ्या साथ... मग सगळं जमतंय बघा... - मधुकर भावे श्री. शरद पवार  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. काही प्रसंग असे असतात की, सहज तोंडून शब्द येतात... ‘झाले ते बरेच झाले...’ चांगल्या गोष्टीसाठीच आगोदर खटकलेल्या घटना घडत असतात.  पूर्वीच्या ‘घड्याळ’ चिन्हापेक्षा ‘तुतारी’ चिन्ह हे  कितीतरी पटीने चांगले चिन्ह आहे. शिवाय मतदार आता खूप शहाणा झालेला आहे. २४ तासांत महाराष्ट्राच्या घराघरांत पवारसाहेबांच्या पक्षाचे नवे चिन्ह नुसतेच समजले नाही तर, चांगले निनादलेले आहे. ‘तुतारी’ फुंकणारा हा शेतकरी आहे. म्हणजे मावळा आहे. योग्य वेळी योग्य चिन्ह मिळाले. दादांच्या गटाला पूर्वीचे ‘घड्याळ’ हे चिन्ह गेले हे बरे झाले.   निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह दादांना दिले. पण, घड्याळ्याची चावी पवारसाहेबांच्या िखशात राहिली. त्यामुळे ते चिन्ह मिळाल्यापासून १०.१० च्या पुढे ते घड्याळ सरकलेच नव्हते. त्यामुळे बंद पडलेले घड्याळ निवडणूक आयोगाने दादांना देवून टाकले. आता ते घड्याळ चालो न चालो... समजा चालले, तरी त्याचा गजर किती मोठा...

*महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी कुस्ती निवेदक सुरेश जाधव यांना कायमस्वरूपी दूध संघातून मानधन चालू केले*

Image
*महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी कुस्ती निवेदक सुरेश जाधव यांना कायमस्वरूपी दूध संघातून मानधन चालू केले* कुस्ती हा खेळ पूर्वीपासून चालत आलेला खेळ आहे. देवाधिकांच्या काळापासून ते राजे महाराजे यांच्याही काळात कुस्तीचे अनेक दाखले आढळतात. पूर्वी कुस्ती शौकीन तिकीट काढून कुस्ती मैदान पाहायला जात होते. पूर्वीच्या काळी अनेक पैलवानांना राजाश्रय होता. अलीकडील काळात मात्र लोकवर्गणीतून पैलवान सांभाळला जात आहे. स्वर्गीय वसंत दादा यांनी शासकीय परिपत्रक काढून कारखाना, दूध संस्था या संस्थेतून मानधनदारी पैलवान सांभाळावे असा आदेश काढला होता. अलीकडील काळात मात्र अनेक दूध संस्थांनी, कारखानदारांनी, कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं जाणीवपूर्वक पाहायला मिळत असताना महाडिक कुटुंबीयांनी मात्र ही परंपरा कायम जपली असल्याचे परवा चिंचोली येथे झालेल्या कुस्ती मैदानात पाहायला मिळाले. नुकताच नव्याने स्थापन झालेला वनश्री दूध संघ या संघाच्या माध्यमातून अनेक कुस्ती मैदानावर आपल्या वाणीने कुस्ती शौकिनांची मने जिंकलेले सुप्रसिद्ध निवेदक सुरेश जाधव चिंचोलीकर यांना वनश्री दूध संघातून कायमस्वरूपी क...