Posts

Showing posts from July, 2023

दोस्तितील राजामाणूस, आनंदराव पाटील*

Image
*दोस्तितील राजामाणूस, आनंदराव पाटील* ............................................................................ शुभेच्छुक:- पै. मनोज मस्के (पत्रकार) ............................................................................. दोस्तीतील राजा माणूस शित्तुर गावचे महान कुस्तीप्रेमी आणि सगळ्यांचे लाडके जिवलग मित्र मा. आनंदराव पाटील मिस्त्री  असंख्य मित्रांचा ज्यांच्या सोबत साठा आहे व प्रत्येकाशी प्रेमाने वागणे हा त्यांचा स्वभाव आहे. अशा जिवाभावाच्या दोस्ताला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.  आज शेडगेवाडी परिसरातील व शाहुवाडी शिराळा भागात कुठे कुस्तीचे मैदान असेल तिथे अवर्जून आनंदराव मिस्त्रीं यांची हजेरी हमखास असते. कुस्ती आणि दोस्ती वारणा-मोरणाचे दुहेरी संगमा प्रमाणे ते टिकवतात, खरंतर दोस्ती करावी ती आनंदराव पाटील यांनीच कारण या मानसाच्या मनाला कुठेही चोरकप्पा नाही. जे असेल ते तोंडावर आणि स्पष्ट बोलणारा हा माणूस... माणूस म्हणून सर्वांना भावतो हे मात्र तितकंच खरं आहे. जवळपास हजार ते दोन हजार मित्रपरिवार त्यांनी या संपूर्ण भागात तयार केला. आणि तो सांभाळला ही मित...

दावणीचा बैल गेला.. वळसणीला ट्रॅक्टर लागला...

Image
दावणीचा बैल गेला.. वळसणीला ट्रॅक्टर लागला... बैलांची संख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात ट्रॅक्टर पूजन केले जात आहेत. मनोजकुमार मस्के -मांगरूळ  शिराळा तालुका तसा कष्टकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी असायची व शेतकामातील कुळव , नांगर , पास , दिंड , कुरी, जू , कोळपे , बैलगाडी आदी सगळे साहित्य असायचे . पण शेतीमध्ये ट्रॅक्टर आला . शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे बैलाचे नांगर भंगारात विकून टाकले . हळुहळू शेतीमधील सर्व कामे ट्रॅक्टर करु लागला आणि त्यामुळे बैलांची संख्या हळूहळू कमी होत गेली . त्यात बैलांसाठी लागणारे खाद्य व वर्षभर सांभाळण्यासाठी लागणारा खर्च परवडेनासा झाला . हल्ली शेतीच्या कामाला नसून शर्यतीपुरताच बैल सांभाळला जातो तो ही काही प्रमाणात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामासाठी बैल सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले व आता काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे . बेंदूर सणाला पुर्वी खूप थाटमाट होता . प्रत्येकाकडे बैल असलेमुळे बाजारपेठेमध्ये खुप मोठी उलाढाल होत असे . कासरे , दावे , गोंढे , कंडे , शिंगाला लावायचे रंग , वेसण , तसेच बैल सज...