वाढदिवसानिमित्त विशेष लेख: सौ. रेणुकादेवी सत्यजित देशमुख –
वाढदिवसानिमित्त विशेष लेख: सौ. रेणुकादेवी सत्यजित देशमुख – सुसंस्कृततेचा व सोज्वळतेचा संगम आजचा दिवस आमदार सत्यजित देशमुख यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत खास आहे. कारण आज त्यांच्या जीवनातील आधारस्तंभ, प्रेरणास्थान आणि कुटुंबाची शान असलेल्या सौ. रेणुकादेवी सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस! एक आदर्श गृहिणी, समाजस्नेही व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ मातृत्वाचा आदर्श हे सारे पैलू त्यांच्यात एकवटले आहेत. सोज्वळ व्यक्तिमत्त्व, सशक्त विचार सौ. रेणुकादेवी यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुसंस्कृततेचा, संयमाचा आणि सन्मानाच्या मूल्यांचा संगम आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या कुटुंबाचा गोडवा आणि संस्कार जपले, ती आजच्या महिलांसाठी आदर्शच आहे. एक सभ्य, सुसंस्कृत आणि थोडा कडक पण खुपच शांत स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या घराला आणि सामाजिक वर्तुळाला एक विशिष्ट ओळख दिली आहे. सामाजिक कार्यातही पुढे आपल्या पतींसोबत सामाजिक कार्यातही त्या सहभागी होत असतात. महिलांसाठी कौशल्यविकास, आरोग्य शिबिरे, शिक्षणवाढ यांसारख्या क्षेत्रांत त्यांनी वेळोवेळी हातभार लावला आहे. ‘स्त्री ही केवळ संस...