*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*
*रात्री माझं गाव विकताना पाहिलं* निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं* कुठे हजारात, कुठे पाचशेत बरबाद होताना पाहीलं गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी *माझं गाव विकताना पाहील* इतक्या दिवस साड्या ओढणारं अचानक साड्या वाटताना दिसलं मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं, रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं* पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला... त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहीला निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं* गरिबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरिबांच्या झोपडीकडे जाताना त्याचे जोडे केवढे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला, निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं* लोकशाही ढाब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरीबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली गाव...