_आगरकर जीवन गौरव पुरस्कारने मधुकर भावे यांचा सोमवारी सन्मान करण्यात आला*
*_आगरकर जीवन गौरव पुरस्कारने मधुकर भावे यांचा सोमवारी सन्मान करण्यात आला* ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक मधुकर भावे यांना ' सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव' पुरस्कार कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील हॉलमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, साम टीव्ही च्या वरिष्ठ पत्रकार सोनाली शिंदे, दैनिक तरुण भारत च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक प्रभावळकर, दैनिक सामनाचे जिल्हाप्रमुख गजानन चेणगे यांनां ही सन्मानीत करण्यात आले. कराड शहरातील पत्रकारांच्या इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन च्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. टेंभू गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रुपाली भोईटे अध्यक्षस्थानी होत्या . प्राचार्य मोहन राजमाने व उद्योजक रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.