अमृत महोत्सवाच्या शासकीय उपचारात उपमुख्यमंत्री फडणवीस का नव्हते?- मधुकर भावे
अमृत महोत्सवाच्या शासकीय उपचारात उपमुख्यमंत्री फडणवीस का नव्हते? - मधुकर भावे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा झाला. शासकीय पातळीवरच साजरा झाला. संपूर्ण मराठवाड्यात लोकांतर्फे हा महोत्सव ज्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे होता, तसा झाला नाही. खरं म्हणजे तसं वाचतावरणच तयार केले गेले नाही. हे वातावरण नेत्यांनी करायचे असते. त्याकरिता नियोजन असावे लागते. सरकारच्या कल्पना आणि नियोजन मर्यादित आहे. त्यामुळे झेंडा फडकवला, राष्ट्रगीत गायले... मराठवाड्याच्या ‘मागास’ या शब्दाला पुसून टाकण्याचे आश्वासन देवून झाले... कार्यक्रम संपला. हा मुक्तीसंग्रामाचा महोत्सव अजिबात वाटला नाही. थोडासा अपवाद लातूरचा. तिथे एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्या संबंधात जनार्दन वाघमारे यांच्यासारख्या माजी कुलगुरुंची मुलाखत... असे कार्यक्रम वातावरण निर्मिती करत असतात. मी १५ अॅागस्ट १९९७ ला म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली त्यावेळी, लातुरच्या ‘एकमत’ला संपादक म्हणून काम करत होतो. सुवर्ण महोत्सवाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. सकाळी ‘एकमत’ कार्यालयात ‘स्वातंत्र...