Posts

Showing posts from November, 2020

सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे विजय पाटील (आबा )

Image
सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित  शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे   विजय पाटील (आबा )होय                     राजकारण समाजकारण उद्योग व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात    समाजाचा आरसा व कष्ट धडपड ध्येय वेडे व्होऊन  ग्रामदैवत श्री मंगलनाथाचा आर्शिवाद व पुण्याईची शिदोरी बरोबर घेऊन आबांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती ची घोडदौड सुरु आहे.  यश उतुंग डोंगराएवढे प्राप्त केले तरी माणुसकीची साखळी पर्वताएवढी आहे .           स्वच्छ चेहरा निर्व्यसनी पण जिद्दी असणाऱ्या आबांनी मांगले गावचे सरपंच म्हणून एक वर्षाच्या कालावधीत गाव विकासासाठी सहकाऱ्यांच्या व माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या  माध्यमातून भरीव योगदान देऊन  आदर्श  सरपंच म्हणून काम केले आहे . कोरोना काळात आर्सेनिक अलबम औषधी गोळ्या मोफत वाटप केल्या. त्याचबरोबर आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना माणसिक आधार देऊन आर्थिक...

अनेक बहिणी आपल्या भावांना ज्ञानाचे भांडार म्हणून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट दिला

Image
चिखली:-  मनोजकुमार मस्के आजची भाऊबीज ही कपडे, मिठाई यांच्या व्यतिरिक्त अनेक बहिणींनी आपल्या भावाला पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट देऊन साजरी केली. हा दिवाळी अंक भेट देण्याच्या मागचा उद्देश कपडे मिठाई, कधी ना कधीतरी संपणार आहे. परंतु या अंकातले लेख असतील, विचार असतील हे आयुष्यभर सोबत राहणार आहेत म्हणून अनेक बहिणींनी कपडे आणि मिठाई बाजूला सारून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट देणे अधिक पसंत केले. यावर्षी कोरोणाचे सावट असल्याने. दिवाळीसारखा  सण आला कधी गेला कधी कळलच नाही. तसा यावर्षी उत्साह फार कमीच पाहायला मिळाला. बघता बघता दिवाळी संपली आणि भाऊबीज आली.                  कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याची आयुष्य मागते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.        ...

ग्रामीण भागातील शेतकरी दिवाळी करणार तरी कशी, आणि कर्ज काढून केलेली दिवाळी गोड लागणार तरी कशी.

Image
चिखली:- मनोजकुमार मस्के सध्या दिवाळीची धामधूम असली तरी शहरी भागात खरेदी करणारांची  गर्दी दिसत आहे.  ग्रामीण भाग मात्र ओस पडलेली दिसत आहेत. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील दिवाळी ही दिवाळखोरीत  निघाली असल्याचे चित्र कुठेतरी दिसत आहे.  संपूर्ण बाजारपेठा खाली खाली दिसत असल्याने. अनेक व्यापाऱ्यांनी जेमतेमच आपल्या दुकानात माल भरला आहे. बाजारपेठेत गिऱ्हाईक नसल्याने त्यांचाही धंदा आतभट्यात आला आहे. ग्रामीण भागात दिवाळीची खरेदी धीमी गतीने असली तरी  शहरे मात्र गजबजलेली आहेत. त्याचबरोबर या वर्षीची दिवाळी काहींच्या घरी फूलुन आहे तर काहींच्या घरी मलीन आहे.       शेतकऱ्याचा गेल्या वर्षी महापुराने, यावर्षी कोरोनाने जीव घेतला. त्यातून कुठेतरी पीक चांगले आले होते त्यात पावसाने सगळं काही बुडवलं. सरकारची मदत अजून कागदावरच आहे. आणि जरी ती खात्यात आली तरी ती तुटपुंजी असणार आहे. गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा अजून शेतकऱ्याच्या माथी तसाच आहे. ज्यांना पगार मिळतो, ज्यांचा धंदा चालतो त्यांना दिवाळी चांगली जाणार हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे  ज्यांना घराब...

महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा व आमदार निवास व्यवस्था समितीवर आमदार मानसिंगराव नाईक यांची सदस्य म्हणून निवड झाली

Image
शिराळा  : महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा व आमदार निवास व्यवस्था समितीवर आमदार मानसिंगराव नाईक यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.  या समिती बाबत माहिती देताना आमदार नाईक म्हणाले, लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे. विधिमंडळाच्या कामकाजात या समितीचे विशेष महत्त्व आहे. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षकांचा अहवाल यांचे परीनिरीक्षण करणे. राज्य सरकारच्या वित्तीय लेख्यांचे व त्यावरील लेखा परीक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे. राज्याची महामंडळे, व्यापारविषयक व उत्पादनविषयक योजना आणि प्रकल्प यांचे उत्पन्न व खर्च दाखवणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरविण्यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्या तरतुदीअन्वये तयार केलेला ताळेबंद व नफा-तोट्याच्या लेख्यांची विवरणे व त्यावरील नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे.  राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परीक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियं...