Posts

Showing posts from January, 2026

मातेचे दु:ख मातेलाच ठावे‘घाईत येतोस आणि परत जातोस... आता कधी येशील?’

Image
मातेचे दु:ख मातेलाच ठावे ‘घाईत येतोस  आणि  परत जातोस...  आता कधी येशील?’ - मधुकर भावे अजितदादा गेले... सर्वांनाच एक दिवस जायचे आहे... पण, दादांना आलेले मरण असे यायला नको होते... हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अनेकजण अचानक जातात... आमचे डॉ. गोवर्धनलाल पाराशर चहा पिता-पिता असेच अचानक गेले. दादांचे जाणे हे अचानक नाही... अत्यंतू क्रूर अशा काळाने त्यांच्यावर झडप घातली. दादांच्या मृत्यूचा धक्का इतका तीव्र होता की, अख्खा महाराष्ट्र हादरून गेला... सर्वांची एकच भावना होती की, ‘अरेरे’... असे मरण नको यायला होते...’ शिवाय अगदी बारामतीच्या वेशीजवळ येऊन दादा अचानक गेले... बारामतीच्या त्या धावपतट्टीवर दादांचे विमान आतापर्यंत इतक्यावेळा उतरले अाहे की, दादांना तो हवाई मार्ग पाठ झाला होता... दादा ‘पायलट’ असते तर त्यांनी काळोखातही ते विमान उतरवले असते... इतकी ती धावपट्टी दादांना माहिती होती... यापूर्वी विमान अपघातात माधवराव शिंदे असेच गेले... तो झटकाही मोठा होता. पण, त्यांचे छोटे विमान वादळात सापडले होते... तेही प्रचाराकरिताच जात होते. त्या घटनेलाही आता १५ वर्षे झाली. आंध्र प्रद...

मातीशी नातं जपणारा, महानगरात स्वतःची ओळख घडवणारा माणूस – कृष्णा बापू पाटील

Image
मातीशी नातं जपणारा, महानगरात स्वतःची ओळख घडवणारा माणूस – कृष्णा बापू पाटील मनोजकुमार मस्के, मांगरूळ  शिराळा तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेला, पण मनाने अख्ख्या शहराला आपलंसं करणारा माणूस म्हणजे कृष्णा बापू पाटील. मोठेपण हे पदाने येत नाही, तर माणुसकीने येतं, हे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासातून दाखवून दिलं आहे. गावाकडची माती अंगावर असतानाच त्यांनी मुंबईसारख्या प्रचंड, धावपळीच्या महानगरात पाऊल ठेवलं. ओळखी नव्हत्या, पाठबळ नव्हतं, नाव नव्हतं — पण स्वप्नं मोठी होती आणि मन स्वच्छ होतं. अशा शहरात टिकणं सोपं नसतं, पण कृष्णा बापूंनी हार मानली नाही. कष्ट, संयम, आणि प्रामाणिकपणा या भांडवलावर त्यांनी राजकारणात हळूहळू आपलं कौशल्य सिद्ध केलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अतिशय साधेपणा, प्रामाणिकपणा आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची वृत्ती – हीच त्यांची खरी ओळख. मोठ्या शहरात राहूनही त्यांचा स्वभाव कधी बदलला नाही. आजही ते तितक्याच सहजतेने सामान्य माणसाशी बोलतात, त्याचं दुःख ऐकतात आणि शक्य तेवढी मदत करतात. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही प्रसिद्धीची हाव ना...