राजकारण गेले चुलीत... कशासाठी भांडताय...महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?- मधुकर भावे
राजकारण गेले चुलीत... कशासाठी भांडताय... महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? - मधुकर भावे पुरोगामी महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचा कार्यक्रम करणारे राजकीय स्वार्थाकरिता भांडत राहिले. कोणीतरी हा खेळ अर्ध्या दाराआडून गंमतीने पहात राहिले. पण, गेल्या २४ तासांत निसर्गाच्या अवकृपेने सर्व जाती-धर्मांच्या कष्टकरी माणसांना आता असे काही झोडपून काढले आहे.... विदर्भ-मराठवाड्यातील सारा शेतकरी उद्धवस्त झाला. अवकाळी पावसाने या शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले. हाता-तोंडाशी आलेला घास कोणीतरी दृष्ट शक्तीने ओढून नेला. जवळपास संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागातील कष्टकरी शेतकरी यात भरडला गेला. अक्राळ-विक्राळ निसर्ग जात विचारत नाही. आरक्षण मिळाले का? विचारत नाही... इथं आम्ही एकमेकांच्या उरावर बसण्याइतपत बेफाम झालेलो आहोत. त्यात सरकारात बसलेले मंत्रीही त्यांच्या जबाबदारीचे भान सोडून मैदानात उतरल्यासारखे शड्डू ठोकत आहेत. आणि एका रात्रीत विदर्भातील कापूस पावसाने बरबाद झाला. गेल्यावर्षीच्या कापसाला भाव नाही म्हणून घरात तो कोंबून ठेवला होता. यावर्षी...