Posts

Showing posts from September, 2024

सुशिलकुमार शिंदे

सुशीलकुमार :अकलुज येथील सत्काराच्या निमित्ताने... - मधुकर भावे  ४ सप्टेंबर २०२४ ला श्री. सुशीलकुमार शिंदे यांचा ८३ वा वाढदिवस  घरीच साजरा झाला. त्यांनी ८ ते४ व्या वर्षात पाऊल ठेवले. २०१५ साली त्यांनी जेव्हा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले होते.... त्या दिवशी सोलापूर येथील लाखो लोकाच्या साक्षीने त्यांचा भव्य सत्कार देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती श्री. प्रणवकुमार मुखर्जी यांच्या शुभहस्ते झाला होता. त्यानंतर गेली ९ वर्षे श्री. सुशीलकुमार यांनी कोणत्याही वाढदिवसाचा कार्यक्रम जाहीरपणे केला नाही. गेली ९ वर्षे तरी ४ सप्टेंबरला ते ‘गायब’ असायचे. फोन लागता लागायचा नाही. या महिन्याच्या ४ सप्टेंबरलासुद्धा ‘ते कुठे आहेत,’ याचा पत्ता लागला नाही.  सार्वजनिक जीवनात गौरव करून घेऊन फार मिरवावे, अशी अनेकांना हौस असते. शिंदेसाहेब त्यातील नाहीत.त्च्यांच्या वाढदिवसाचे ‘होर्डींग्ज’ लागलेले कधीही, कुठेही  पाहिलेले नाहीत. वाढदिवसाची जाहिरात ते करत नाहीत. वृत्तपत्रातही त्यांच्या वाढदिवसाची जाहिरात दिसत नाही. वाढदिवस ही कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे... असे मानणारे ते आहेत. पण, कसे काय, कोणास ठाऊक....